मोठ्या बातम्या

नाशिक सह महाराष्ट्राला फुकटच्या पैशाचा मोह नडला…कोट्यावधी रुपये बुडाले

नाशिक सह महाराष्ट्राला फुकटच्या पैशाचा मोह नडला...कोट्यावधी रुपये बुडाले


वेगवान मिडीया / साहेबराव ठाकरे

नाशिक, ता. 7 सप्टेंबर 2024- काम धंदा न करता फुकटचे पैसे कसे मिळतील या आशावरती ही जनता जगू लागलेली आहे आपण शंभर रुपये कमवले या शंभर रुपयाचे आपल्याला एका मिनिटात दोनशे रुपये कसे मिळतील यासाठी चाललेल्या महाराष्ट्र तसेच देशातील प्रत्येक माणसाचा अट्टाहास, मात्र हाच अट्टाहास माणसाला एकदा खड्ड्यात घेऊन जातो. असाच प्रकार महाराष्ट्रामध्ये समोर आलेला आहे पैशाचं दाम दुप्पट अमिश दाखवलं आणि नाशिक सह महाराष्ट्रातील लोकांचे करोडो रुपये बुडाले..Nashik and Maharashtra were not tempted by the free money… Crores of rupees were lost

सात वर्षांपूर्वी 28 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात सहा वर्ष जेलमध्ये राहिलेल्या व वर्षापूर्वी जामीन वर सुटून आलेल्या एका साथीदारासह पुन्हा फसवणूक करत दोन महिन्यात दाम दुप्पट पैशाचा पुन्हा आम्हीच दाखवलं आणि ही जनता पुन्हा दाम दुप्पट पैशाला बळी पडली आतापर्यंत या ताज्या प्रकरणात 51 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलेला आहे आता तक्रार दाखल झाली असून हा घोटाळा कोट्यावधी रुपयाकडे जाण्याची वाटचाल सुरू झाली आहे.

हा आकडा १००० कोटीच्या पुढे जाण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. संशयित आरोपी सतीश पोपटराव काळे असून जुन्या गुन्ह्यात स्वतःहून धाराशिव जिल्ह्यातील लोहारा पोलीस ठाण्यात त्यांना हजर होत अटक करून घेतली होती. ज्या गुन्ह्यात जामीन मिळवुन दुसरा  गुन्हा केल्याचे पोलिसांनी कोर्टाच्या निदर्शनात आणून दिल्यास या काळेचा जामीन रद्द होऊन त्याची कारागृहात रवानगी होऊ शकते. महाराष्ट्र गुंतवणूकदार हित संरक्षण कायद्यात 3 व 4 अनन्वये व भारतीय दंड विधानसहिता कलम 467 गुन्हा दाखल असेल तर जामीन मिळू शकत नाही .या गुन्ह्यात सात वर्ष ते जन्मठेपेची शिक्षेची तरतूद आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

दाम दुपट्टा पैशाचा आम्हीच दाखवत काळेने स्टार इन्स्पायर ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड च्या दादर मिरा रोड भाईदर कोलकत्ता अहमदाबाद दिल्ली येथे शाखा उघडल्या होत्या त्यामुळे तेथूनही मोठा घोटाळा उघडकीस येण्याचा अंदाज आहे.

कष्टाचे पैसे पुरत नाहीत तेव्हा दाम दुप्पट पैसे कमवून या काळेने हेलिकॉप्टर आणि जेट तसेच विमाने खरेदी करण्याचे स्वप्न हा काळे पाहत होता.

हा प्रकार कसा घडाला ते समजून घ्यावे.

नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव कांद्याच्या बाजारपेठ जवळ असलेल्या टाकळी विंचूर येथील रहिवासी असलेला हाच तो सतीश काळे.  या माठकाने गावातील साथीदार योगेश परशराम काळे यांच्यासह फसवणूक केली आहे. पेशांना शिक्षक असलेल्या काळे ने 2017 मध्ये ढोकेश्वर मल्टी को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून मुदत ठेवी आणि नोकरीला लावून देण्याचा आमिषाने जवळपास 28 कोटी रुपयांची फसवणूक केली होती.

जामिनावर सुटल्याने त्यांनी लासलगाव मध्ये स्टार इन्स्पायर ज्वेलर्स प्राइवेट लिमिटेड या कार्यालयाची स्थापना करून एक ते दोन महिन्यात पैसे दाम दुप्पट करण्याचे अमिश दाखवल्याने शहरातील मोठ्या व्यवसाय करणा-यांनी त्यामध्ये रक्कम गुंतवली. रकमेचा परतावा मिळाल्याचे खात्री झाल्यावर मोठ्या प्रमाणात अनेक छोटे व्यवसायिक व गरीब जनतेने  कष्टाची कमाई त्यामध्ये गुंतवली.

तो मोठ्या प्रमाणात एंजट लोकांना कमिशन देत होता. गेल्या पाच दिवसापासून तो कार्यालयातून गायब झाल्याने नागरिकांमध्ये चलबिचल झालीू.. लासलगाव पोलीस ठाण्यात शनिवारी एका ठेवीदाराने तक्रार दाखल केली. यानंतर सतीश काळाने योगेश काळे आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. काळे पुन्हा येईल आणि आपले पैसे देईल  या अशाने गेल्या पाच दिवसापासून अनेक ठेवीदार तक्रार करायला पुढे येत तयार नव्हते.

जेंव्हा 700 ते आठशे लोक एकत्र आल्यानंतर हे सत्य बाहेर येऊ लागले.. आता लासलगाव  पोलीस पुढील तपास करीत आहे. हा काळे आता नेपाळ मध्ये परदेशात पळून जाणार असल्याची चर्चा आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!