नांदगावमधील राजकारणात… होम मिनिस्टर च्या निमित्ताने समीर भुजबळ मैदानात
नांदगाव मधील राजकारणात... होम मिनिस्टर च्या निमित्ताने समीर भुजबळ मैदानात

वेगवान नासिक/ Wegwan NASHIK
नांदगाव, दि.7 ऑक्टोबर 2024,सोमवार
(मुक्ताराम बागुल) :- नासिक जिल्ह्याच्या नांदगाव मनमाड मालेगाव विधानसभा मतदारसंघातील नांदगाव शहरातील लाडक्या बहिणींसाठी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने धमाल “होम मिनिस्टर” कार्यक्रम नांदगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पार पडला. यावेळी बिग बॉस मराठी सीजन 3 व हर हर महादेव फेम अभिनेत्री सोनाली पाटील व “होम मिनिस्टर” फेम भूषण कापडणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये “होम मिनिस्टर” हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, नांदगाव विधानसभेचे माजी आमदार पंकज भुजबळ, जपानी भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदगाव तालुकाध्यक्ष विजय पाटील, विनोद शेलार, प्रसाद सोनवणे, बाळासाहेब देहाडराय, महिला तालुकाध्यक्ष अपर्णा देशमुख, महिला शहराध्यक्ष सीमा राजोळी, योग तालुकाध्यक्ष सोपान पवार, योगिता पाटील, शिवकन्या संगीता सोनवणे, अशोक पाटील
दीपक खैरनार, गौतम जगताप, दिगंबर सोनवणे, विश्वास अहिरे, सचिन देवकाते, फैसल शेख, चंद्रकला बोरसे, शिवा सोनवणे, महेश पवार, दया जुन्नरे, शंकर शिंदे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
