नाशिक ग्रामीण
शहरी विद्यार्थ्यांना टक्कर देत ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रश्नमंजुषा स्पर्ध्येत ठरले सरस
वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : शैक्षणिक पद्धत, अतिरिक्त शिकवण्या, स्पर्धात्मक वातावरण यामुळे शहरी भागातील विद्यार्थी नेहमीच एक पाऊल पुढे राहतात, हा सर्वांचा समज देवळा तालुक्यातील भावडे सारख्या ग्रामीण भागातील एस.के.डी शाळेच्या विध्यार्थ्यांनी पुसून टाकत जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत नामांकित शहरी शाळेच्या विद्यार्थ्यांना मागे टाकत राज्य स्थरीय पातळीसाठी पात्रता मिळविली आहे.
नाशिक येथील इन्टेक हेरिटेज टीम ने आयोजीत केलेल्या जिल्हा स्थरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेसाठी नाशिक शहरातील विजडम हाय इंटरनॅशनल स्कुल, दिल्ली पब्लिक स्कुल, होरायजन अकॅडेमि, कॅमब्रिज इंटरनॅशनल स्कुल, सिम्बॉयसिस इंटरनॅशनल स्कुल या सारख्या नामांकित शाळांनी सहभाग घेतला होता.
या सर्व नामांकित शहरी शाळेतील विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला टक्कर देत देवळा तालुक्यातील भावडे सारख्या ग्रामीण भागातील एस.के.डी. इंटरनॅशनल स्कूलच्या टीम मधील रुद्राक्ष सोनवणे, भार्गव जाधव, अथर्व कापडणीस व कृष्णा आवारे यांनी अनुक्रमे पहिला व द्वितीय क्रमांक पटकावून राज्य स्थरीय पातळीसाठी पात्रता मिळविली. त्यांचे हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक नवीन दिशा देणारे ठरणार असून यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास देखील वाढणार आहे.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे प्रमुख संजयजी देवरे, सेक्रेटरी मीना देवरे, प्राचार्य सुनिल पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेच्या यशासाठी टीम ला कु. कावेरी पवार व इंग्रजी विभागातील सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रसंगी बबलू देवरे, सागर कैलास इत्यादी उपस्थित होते.
गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, वेगवान न्यूज, कसमादे मीडिया, माय महानगर, नाशिक सिटी न्युज, जागर जनस्थान, इंडिया दर्पण, बी.टी.एल. न्यूज मराठी इत्यादी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. मुख्यतः राजकारण, शेती, क्राईम, विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.