पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील या धरणातून पडला सांडवा
वेगवान नाशिक/ एकनाथ भालेराव
येवला , ता. 6 आॅक्टोबर या वर्षीचा पावसाळा सुरू झाला आहे आणि आता संपला आहे, परंतु या वर्षीच्या खरीप हंगामात अधूनमधून पडणाऱ्या पावसाचा पिकांवर परिणाम झाला आहे, एकतर त्यांच्या उत्पादनात वाढ किंवा घट झाली आहे.
मात्र, रब्बी हंगामातील पिके आणि पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवण्याची दाट शक्यता होती. नांदगाव तालुक्यातील लक्ष्मीनगर-मांडवड येथील शाकंबरी नदीवर बांधलेले धरण आज ओव्हरफ्लो झाले आहे. धरण भरल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील नागरिकांसह शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. मात्र, पावसाने पुनरागमन केल्याने अनेक भागातील नद्या फुगल्या असून, गळती असलेले छोटे-मोठे तलाव भरले आहेत. पाणी ओसंडून वाहत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने लोहशिगवे धरण परिसरात पाणी साचले आणि तेथून हे पाणी लक्ष्मीनगर-मांडवड धरणापर्यंत पोहोचल्याने प्रदीर्घ प्रतिक्षा संपली. त्यासाठी शेतकरी मोठ्या पावसाची आतुरतेने वाट पाहत होते.
तालुक्यातील अनेक गावे या नदीवर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. खरीप हंगाम संपून रब्बी हंगामही संपत आला असला तरी तालुक्यात अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्याने नदी-नाले कोरडे पडले आहेत. मात्र, पुरेसा पाऊस झाल्यास नद्या-नाले व्यवस्थित वाहतील आणि रब्बी हंगाम सुरक्षित होईल.
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये