बुक्कीत टेंगुळ सुरज “गोलीगत” झाला मालामाल,एवढं धन मिळाले Bigg Boss Marathi Season 5 Winner
Tengul Suraj was "shot" in Bukkit, got so much money

वेगवान नाशिक / धिरेंद्र कुलकर्णी
मुंबई, ता. 6 सप्टेंबर 2024- Bigg Boss Marathi Season 5 Winner कोणाचे भाग्य कधी उजळेल याचा काही नियम नाही तुम्ही आपलं काम करत राहा एक दिवस तुमचा निश्चित येणार, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सुरज चव्हाण, गोलीगत धोका म्हणता म्हणता सुरज चव्हाण बिग बॉसच्या घरात जाऊन पोहोचला, एवढेच नाही बिग बॉसच्या या शोमुळे सुरज चव्हाण सर्वसामान्यांचा चेहरा बनला आणि आता सुरज चव्हाण या बिग बॉस मराठीचा विजेता झालेला आहे. हा सगळ्यांसाठी एक आनंदाचा क्षण आणि महाराष्ट्राने दिलेले सुरजला प्रेम यावर हा विजय आहे. Tengul Suraj was “shot” in Bukkit, got so much money
बारामती चा सुरज चव्हाण याला मोठ्या प्रमाणात लुबाडण्यात आलं, त्याचं कारण असं होतं ज्यावेळेस टिक टोक नावाचा ॲप होतं त्या tiktok वरती सुरज चव्हाण रील्स बनवत होता, सुरज चव्हाण चे रील मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायचे आणि त्यादरम्यान सुरज चव्हाण ला दोन पैसे सुध्दा मिळतं नव्हते. सुरज चव्हाण चे व्हिडीओ व्हायरलं व्हायचे. मात्र यातून जो पैसा मिळायचा तो त्याचा अनेकांनी वापर करुन घेतला. त्याची फसवणूक केली. मात्र भगवान के घर में देर है अंधेर नही ही हिंदी म्हण सुरजला लागु पडते.
एका चार भिंतीत राहणार सुरज आई नाही वडील नाही कुणाचाही आसरा नाही एकटा राहणाऱ्या या सुरज चव्हाण वर महाराष्ट्राने आपला जीव ओवाळून टाकला. महाराष्ट्रने सुरज ला एवढा भरभरून दिलं की सुरज या आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेचा आयुष्यभराचा ऋणी राहील. बिग बॉस मराठीच्या या शो मधून सुरत चव्हाण च नाव प्रत्येकाच्या घरात घरात प्रत्येकाच्या मनामनात कोरले गेले.
कुठल्याही पद्धतीचा सुरजला ना लिहिता न वाचता येत नाही. सुरजला साधे पाढे ही बोलता येत नाही याचा अर्थ म्हणून सुरज म्हणतो मी शिकलो असतो तर मला नॉलेज आलं असतं.
टॉप सहा मधून सुरज ना ही बाजी पटकावली आहे. निकी तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार अंकिता वालवलकर, जानवी किल्लेदार आणि सूरज चव्हाण हे बिग बॉस मराठीचे फायनल लिस्ट मधील सदस्य होते.
यामध्ये आधी जान्हवी किल्लेकर ही नऊ लाख रुपये घेऊन त्यानंतर अंकिता वालावलकर घराबाहेर पडल्या.
टॉपच्या चार स्पर्धाकतून धनंजय पोवार ला माघार घ्यावी लागली. त्यामुळे सुरज अभिजीत आणि निकी टॉप तीन मध्ये धडक दिली.
अभिजीत आणि निक्कीने टॉप 3 मध्ये धडक दिली. यामध्ये सूरजने बाजी मारत टॉप 2 मध्ये स्थान मिळवलं. अखेर प्रेक्षकांनी निर्णय देत सूरजला बिग बॉस मराठीचा विजेता केलं.
सुरजला किती पैसे मिळाले.
14 लाख 60 चा धनादेश
10 लाखाची पु.न.गाडगीळ ची गिप्ट व्हाऊचर
Tunwal ची इलेक्ट्रीक बाईक
आणि बीग बॅास ट्रॅाफी
एवढं सारं सुरजला मिळाले..
झापुका झुपक चित्रपटामध्ये सुरज मुख्य हिरो दिसणार. कलर्स मराठी काढणार चित्रपट
