अचानक आलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान ,,,
परतीच्या प्रवासाने निरोप घेऊन दिली सलामी !

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर : दि. ६ ऑक्टोबर —सिन्नर च्या पुर्व भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.. यात नगर जिल्ह्यातील काही गावांचा समावेश आहे.काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा आज दुपारनंतर पावसाने सुरुवात केली असुन अद्याप पाऊस सुरू च आहे.. अचानक आलेल्या या पावसाने शेतकरी.व मजुरांची चांगली च तारांबळ उडाली आहे तर अनेक शेतकरी सोयाबीन सोंगणी करण्यात गुंतले होते परंतु अचानक आलेल्या या पावसाने त्रेधातिरपीट झाली असून सोयाबीन ओली झाली तर नुकसान होण्याची शक्यता आहे…
अ.नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात व नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवर व सिन्नर तालुक्यातील पुर्व भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.. शेतकरी सुखावला असला तरी सोंगणी ला आलेल्या पिकांची अनेक शेतकरी काळजीत पडले पडले आहेत .. मात्र परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे.
