मोठ्या बातम्या

पाऊस पु्न्हा धो-धो कोसळणार तेही या तारखेपासून Heavy rain in Maharashtra

पाऊस पु्न्हा धो-धो कोसळणार तेही या तारखेपासून


वेगवान नाशिक / धिरेंद्र कुलकर्णी

नागपूर, ता. 5 आॅक्टोबर 2024-  Heavy rain in Maharashtra  यंदा मान्सून ने महाराष्ट्रात चांगले हजेरी लावल्यामुळे महाराष्ट्रातील पीक पाणी चांगले आलेले आहे. यंदा महाराष्ट्रात तरी दुष्काळ नाही, हे म्हटलं तर वावग ठरणार नाही, मात्र आता मान्सून एक दोन दिवसात महाराष्ट्रातून जाणार आहे. मान्सून माघारी फिरला आहे. मात्र पाऊस पुन्हा धो-धो बरसणार आहे. From this date the rain will fall again

महाराष्ट्रातल्या अनेक धरणे ओसंडून वाहत आहे. अनेक ठिकाणी शंभर टक्यापेक्षा जास्त पाऊस झाला आहे. तर नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात अजून पाऊस पडला तरी चालेल असे पण शेतकरी बोलत आहे.

मान्सून देशातून माघारी फिरला आहे.  मात्र तो  राज्यातून एक दोन दिवसात माघारी फिरणार आहे. मात्र , त्या दरम्यान महाराष्ट्रात पुन्हा पाऊस कोसळणार आहे. येत्या 15 ते 20 दिवस महाराष्ठ्रात पाऊस बॅटींग करणाऱ आहे असा अंदाज हवामान  खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. Heavy rain in Maharashtra

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

 

हवामान खात्याने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना वेगवेगळ्या अलर्ट दिलेले आहे. काही जिल्ह्यांसाठी वेगवेगळा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. ढगांच्या गडगडाटासह तसेच विजांसोबत पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय.

त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन मका हे पीक जर काढणीला आलेला असेल तर अशा शेतकऱ्यांना मात्र काळजी करण्याची गरज आहे.जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत पावासाचा येलो अलर्ट आहे तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्याची आणि विजांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

परवा मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. तर त्यानंतरच्या दिवशी म्हणजेच ७ ऑक्टोबर रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण आणि दक्षिण विदर्भात पावसाची शक्यता आहे. ८ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचा संपूर्ण दक्षिण पट्टा आणि विदर्भात पावासाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील इतर जिल्ह्यांतही विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!