विद्युत रोषणाई व फटक्यांच्या आतषबाजीने लोकार्पण सोहळा झाला नेत्रदीपक
विद्युत रोषणाई व फटक्यांच्या आतषबाजीने लोकार्पण सोहळा झाला नेत्रदीपक

वेगवान नाशिक/ एकनाथ भालेराव
येवला,दि.२ऑक्टोबर:- राज्याचे अन्न,नगरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून व संकल्पनेतून येवला शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराजाच्या संकल्पनेवर आधारित सुमारे चार एकर जागेत भव्य शिवसृष्टी प्रकल्प साकारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली येवला शहरात पार पडले. येवला शहरातील शिवसृष्टी प्रकल्पाच्या या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने येवलेकरांनी नयनरम्य सोहळा अनुभवला.
या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांचे धगधगते चरित्र दाखविणाऱ्या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात सुप्रसिद्ध अभिनेते भूषण प्रधान, अविनाश नारकर, सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्यासह कलाकारांनी ‘सरनार कधी रण’ या प्रयोगाचे सादरीकरण केले. यातून स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते, स्वराज्यनिष्ठेचे प्रतीक कान्होजी जेधे, स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर, महाराजांचा खास विश्वासू मदारी मेहतर, शुरयोद्धे बाजीप्रभू देशपांडे, स्वराज्याचे सरनौबत नेताजी पालकर, स्वराज्य संग्रामाचे पहिले सरसेनापती बाजी पासलकर, स्वराज्याचे शूरवीर जिवा महाला, रणमर्द मावळा येसाजी कंक, सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे, स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक, अजिंक्य सरखेल कान्होजी आंग्रे, शूरवीर शिवा काशिद, शूरवीर रामजी पांगेरा, आरमार प्रमुख सिद्धी हिलाल यांच्यासह महत्त्वाचे सरदार व मावळ्यांच्या तसेच छत्रपती शहाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा धगधगता इतिहास मांडला. शिवचरित्रावर आधारित या विशेष कार्यक्रमाने शिवप्रेमींची मने जिंकली.
त्याचबरोबर सुप्रसिद्ध शाहीर प्रा.डॉ.गणेश चंदनशीवे यांनी पोवाडे, गोंधळ, जोगवा नृत्य तसेच महाराष्ट्र गीताच्या सादरीकरण करणातून उपस्थितांचे मने जिंकली. तर सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या गायनाने शिवप्रेमी मंत्रमुग्ध झाल्याचे पाहावयास मिळाले.
*लोकार्पण सोहळ्यानंतर पार पडलेल्या विशेष फायर शोतून येवलेकरांनी अनुभवला नयनरम्य सोहळा*
शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आल्यानंतर तसेच सांस्कृतिक कार्यक्रमानंतर विशेष आकर्षक फायर शो चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसृष्टी प्रकल्पाच्या प्रांगणात येवलेकरांनी मोठी गर्दी केली. त्यानंतर याठिकाणी फायर शो पार पडला. या फायर शोच्या माध्यमातून येवलेकरांना नयनरम्य सोहळा अनुभवता आला.
*माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नियोजनाचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याकडून कौतुक*
कुठलाही प्रकल्प हाती घेतल्यानंतर माजी खासदार समीर भुजबळ हे त्यात पूर्ण लक्ष केंद्रित करून अतिशय मेहनत घेऊन काम करतात. त्यांनी केलेले नियोजन हे अतिशय चोखच असते असे सांगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नियोजनाचे विशेष कौतुक केले.
*असा आहे शिवसृष्टी प्रकल्प……*
मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून या शिवसृष्टी प्रकल्पात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा १२ फुट उंचीचा ब्राँझ धातूचा पूर्णाकृती सिंहासनाधिष्टीत पुतळा बसविण्यात आला आहे. या प्रकल्पाची संपूर्ण रचना ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजदरबारा प्रमाणे असणार आहे. शिवसृष्टीचे भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. या प्रवेशद्वाराला असलेले तीनही दरवाजे सागवानी लाकडाचे असुन एक एका दरवाजाचे वजन दोन टन इतके आहे. शिवसृष्टीत महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना आणि महाराजांचे सेनापती यांचे भित्त्तीचित्रे व शिल्प, शिवकालीन शस्त्रास्त्रांचे आणि पुस्तकांचे प्रदर्शन, शिवकालीन इतिहासाची माहिती देण्यासाठी ऑडीओ व्हिज्युअल हॉल, सुरेख गार्डन, बुरुजांचा समावेश असलेली संरक्षण भिंत आणि नयनरम्य कारंजे यासह विविध कामांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकल्प राजस्थान येथून घडवून आणलेल्या दगडात तेथील कारागिरांच्या माध्यमातून साकारण्यात येत आहे.
पुरातन शैलीची साक्ष देणाऱ्या स्लॅब स्ट्रक्चर मध्ये गॅलरी बांधण्यात येत आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील काही प्रसंगांचे शिल्प तसेच स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते, स्वराज्यनिष्ठेचे प्रतीक कान्होजी जेधे, स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर, महाराजांचा खास विश्वासू मदारी मेहतर, शुरयोद्धे बाजीप्रभू देशपांडे, स्वराज्याचे सरनौबत नेताजी पालकर, स्वराज्य संग्रामाचे पहिले सरसेनापती बाजी पासलकर, स्वराज्याचे शूरवीर जिवा महाला, रणमर्द मावळा येसाजी कंक, सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे, स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक, अजिंक्य सरखेल कान्होजी आंग्रे, शूरवीर शिवा काशिद, शूरवीर रामजी पांगेरा, आरमार प्रमुख सिद्धी हिलाल यांच्यासह महत्त्वाचे सरदार व मावळ्यांच्या शिल्पांचा यामध्ये समावेश आहे.
*असा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्टीत पुतळा*
शिवसृष्टीत बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा १२ फूटी सिंहासनाधिष्टीत ब्राँझ धातूचा आहे. रायगडावरील तसेच विधानभवनात बसविण्यात आलेल्या पुतळ्यासारखाच हा पुतळा आहे. या पुतळ्याची रुंदी ८ फुट असून पुतळ्याची उंची १२ फुट असणार आहे. पुतळ्याचे एकूण वजन ५ टन इतके आहे. या पुतळयासाठी १५ फुट खोलवरुन कॉक्रीट चौथरा उभारण्यात आला आहे. यावर राजस्थान येथून घडवलेले नॅचरल स्टोन व मार्बलचा वापर करण्यात आला आहे. हा पुतळा कुडाळ येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार बाळकृष्ण (दाजी) पांचाळ आणि नंदु पांचाळ यांच्या हस्ते साकारण्यात आले आहे. तर आर्किटेक्ट सारंग पाटील यांनी प्रकल्पउभारण्यात विशेष योगदान दिले आहे.
*येवल्याच्या विकास कामांच्या सचित्र दिनदर्शिकेचे प्रकाशन*
येवला मतदारसंघात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी हजारो कोटी रुपयांची विकासकामे केली आहे. या विकास कामांच्या सचित्र दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये