मोठ्या बातम्या
नाशिकः मुंबई- आग्रा महामार्गावर पोलीसांनी भरलेल्या वाहनाचा अपघात, वाहनाचा खुर्दा
वेगवान नाशिक
चांदवड, ता. 4 आॅक्टोबर 2024- मुंबई आग्रा महामार्गावर मुख्यमंत्र्यांच्या पोलीस बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. पोलीस मुख्यालयातील कमर्माचीर घेऊन निघालेल्या या वाहनाचा राहुड घाटामध्ये अपघात झालाय.
नाशिक ग्रामीण पोलीसांचे हे वाहन असून यामध्ये 12 पोलीस बसलेले होते. यामधील पोलीस जखमी झाले असून जखमीवर उपचार सुरु आहे. टोल प्लाझा च्या कर्मचा-यांनी येऊन जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले असून सर्वाची प्रकृती चांगली आहे.