नाशिक ग्रामीण

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला शहरातील २० कोटी ६२ लाखांच्या विविध विकास कामांचे आज होणार भूमिपूजन

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला शहरातील २० कोटी ६२ लाखांच्या विविध विकास कामांचे आज होणार भूमिपूजन


 

वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला,दि.३ ऑक्टोबर :-* राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या येवला शहरातील २० कोटी ६२ लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते दि.४ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता या भूमिपूजन कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे.

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला शहरातील पाटोदा रस्ता ते सोनवणे वस्ती पावेतो रस्ता कॉक्रीटीकरण करणे ८० लाख,
येवले नगरपरिषद हद्दीतील महात्मा फुले नाट्यगृहाचे आधुनिकीकरण करणे २ कोटी, येवले नगरपरिषद हद्दीतील महात्मा फुले नाट्यगृहाचे विद्युतीकरण करणे २ कोटी २५ लाख, येवला शहरातील म्हसोबा नगर भागातील रस्ते गटारीसह कॉक्रिटीकरण करणे ५० लाख, येवला शहरातील म्हसोबा नगर स.नं.१४ पैकी मधील रस्ता कॉक्रिटीकरण करणे व भूमिगत गटार बांधकाम १५ लाख,शहरातील पटेल कॉलनी भागातील बिरारी सर ते प्रविण पवार पावेतो रस्‍ता कॉक्रीटींकरण व भुमिगत गटार बांधकाम करणे २० लाख, शहरातील पटेल कॉलनी भागात श्री. घोलप यांचे घर ते श्री. कायस्थ्यां चे घरापर्यत भुयारी गटारी सह रस्ता कॉक्रीटीकरण करणे ४७.१८ लाख, शहरातील आनंद नगर भागात श्री. शरमाळे सर ते गौरव कुलकर्णी यांचे घरापर्यत रस्ता गटारीसह कॉक्रीटीकरण करणे २४.९४ लाख, शहरातील नाशिक महामार्ग विंचूर रोड पानी टाकी ते परेगांव रस्त्या पावेतो रस्ता कॉक्रिटीकरण करणे व अनुषंगिक करणे १ कोटी ८० लाख, शहरातील मथुरा नगर मधील योगेश खैरनार यांच्या घरापासून विघ्नहर्ता हॉस्पिटल पर्यंत भूमिगत गटारीसह रस्त्याचे कॉक्रिटीकरण करणे ३५ लाख या कामांचे नियोजन करण्यात येणार आहे.

येवला शहरातील श्रीराम कॉलनी येथील रस्ता कॉक्रिटीकरण व अनुषंगिक गटार बांधकाम करणे ७० लाख, शहरातील श्रीराम कॉलनी केंगे बाबा घरापासून ते अनिल गोसावी घरापर्यंत भुयारी गटारीसह रस्ता कॉक्रिटीकरण करणे ५० लाख, शहरातील श्रीराम कॉलनीतील स.नं.१०८ रमेश शिंदे यांच्या घरापासून ते जगन काबरा यांच्यापर्यंत रस्ता कॉक्रिटीकरण करणे ७० लाख, शहरातील पारेगांव रोड भागातील स्वामी समर्थ मंदिर भागातील रस्ते गटारीसह कॉक्रिटीकरण करणे ५० लाख,
शहरातील पारेगांव रोड भागात भूमिगत गटार बांधकाम करणे व अनुषंगिक रस्ता कॉक्रिटीकरण करणे ५० लाख, शहरातील स.नं.८९ बाजीराव नगर भागातील रस्ते गटारीसह कॉक्रिटीकरण करणे ५० लाख, शहरातील कै.भाऊलाल पहिलवान लोणारी व्यापारी संकुल परिसरातील रस्ता कॉक्रिटीकरण करणे व भूमिगत गटार बांधकाम करणे ५० लाख, शहरातील महात्मा फुले कॉलनी ते दिनेश महाजन यांच्या घरापर्यंत रस्ता कॉक्रिटीकरण करणे व गटार बांधकाम करणे ५० लाख, शहरातील सटवाई गल्ली येथील रस्त्याचे कॉक्रिटीकरण करणे ६५.८५ लाख, येवला शहरातील कलावती आई मंदिरासमोरील भागातील किशोर जाधव ते अमोल पगारे पावेतो रस्‍ता कॉक्रीटींग व भुमिगत गटार बांधकाम करणे ३५लाख या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर येवला शहरातील देसाई ड्रीम सिटी जवळील खुली जागा विकसित करणे २५ लाख, शहरातील स.नं. 17/6 रजा मस्जिद लगतील रस्ता अंडरग्राऊंड गटारीसह कॉक्रीटीकरण करणे. ४५.९८ लाख,येवला शहरातील लक्ष्मीआई मंदिर ते नगद दरवाजा रोड (नांदगाव रोड) पावेतो रस्ता डांबरीकरण व कॉक्रिटीकरण करणे व अनुषंगिक गटार बांधकाम करणे ७० लाख,शहरातील अखतामर चिचा ते सैय्यद बाबा चौक यांचे घरापर्यंत भूमिगत गटारीसह रस्त्यांचे कॉक्रिटीकरण करण्यासाठी १० लाख, शहरातील राजु मिमी ते सादिक कुरेशी यांचे घरापर्यंत भूमिगत गटारीसह रस्त्याचे कॉक्रिटीकरण करणे २५ लाख, शहरातील जावेद भाई मिठाईवाले ते नुरी हाजी साहेब यांचे घरापर्यत गटार व कॉक्रीटी करण करणे. २१.७९ लाख, शहरातील चांद फकीर मशिद ते सलीम चहावाले यांचे घरापर्यंत भूमिगत गटारीसह रस्त्याचे कॉक्रिटीकरण करणे २५ लाख, शहरातील मुश्ताक चमन ते याकीलशेठ गाझी यांचे घरापर्यंत भूमिगत गटारीसह रस्त्यांचे कॉक्रिटीकरण करणे १५ लाख, शहरातील जुर अहमद ते अकिलभाई जरीवाले यांचे घरापर्यंत भूमिगत गटारीसह रस्त्यांचे कॉक्रिटीकरण करणे १५ लाख, अजीजभाई खरिवले ते सैय्यद पानवाले ते हमीदखान ते रशीद गुलाब पावेतो रस्ता कॉक्रिटीकरण करणे १२ लाख या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.

तसेच येवला शहरातील भगवान साबळे ते रंगनाथ पुरे यांचे घरापर्यंत भूमिगत गटारीसह रस्त्यांचे कॉक्रिटीकरण करणे १६ लाख, शहरातील जहागिरदार कॉलनी भागात रस्ता गटारीसह कॉक्रीटींकरण करणे १५.९५ लाख, शहरातील शेंद्री बारव ते शादी हॉल पावेतो रस्ता कॉक्रिटीकरण करणे ३० लाख, शहरातील जुनी नगर परिषद रस्ता ते म.रा.वि.मं कंपनी ऑफिस ते सुंदर नगर पर्यंत रस्ते रस्ता कॉक्रिटीकरण करणे व भूमिगत गटार बांधकाम करणे १५ लाख, शहरातील जुना नगरपालिका रस्ता कॉक्रिटीकरण करणे ७० लाख,शहरातील गवंडी गल्ली भागात रस्ता कॉक्रिटीकरण करणे व भूमिगत गटार बांधकाम करणे २० लाख, शहरातील जाईचा मारुती तालीम ते संभाजी जेजुरकर यांचे घरापर्यंत रस्ता कॉक्रिटीकरण करणे व भूमिगत गटार बांधकाम करणे १५ लाख, शहरातील काटे मारुती ते लोढा किराणा पर्यत रस्ता कॉक्रीटींग व भुमिगत गटार बांधकाम करणे ४४.८२ लाख, शहरातील स.नं.१२१/२ मधील ओपन स्पेस सुशोभीकरण व चारीवर कॉक्रिटीकरण करणे ८० लाख, शहरातील नविन नगरपरिषद शेजारील रस्‍ता कॉक्रीटींग करणे १० लाख, येवला हद्दीतील स.नं. 52/2 बोरसे सर यांच्या घरापासुन ते कापसे घरापावेतो रस्ता कॉक्रीटींग व भुमिगत गटार बांधकाम करणे. ४२.२१ लाख, शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर समोर भूमिगत गटार करणे २० लाख अशा विविध विकास कामांचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे.


एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!