नाशिक जिल्ह्यातीत मोकळ्या पाण्यात कपडे धुणे बेतले जीवावर, दोन मुली…
नाशिक जिल्ह्यातीत मोकळ्या पाण्यात कपडे धुणे बेतले जीवावर, दोन मुली...

वेगवान नाशिक/ एकनाथ भालेराव
येवला दिनांक 4/10/2024 /येवला तालुक्यातील कातरणी येथे धुणे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या चुलत बहिणींचा बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून दिनांक 4/10/2024रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला.तिसऱ्या मुलीला वाचविण्यात यश आले आहे.या घटनेने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. मोकळ पाण्यात कपडे चांगले निघतात म्हणून महिला व मुली या तलाव, बंधारे, नदी, कालव्या यांच्या किना-यावर जावून कपडे धुवतात. आणि हेच कपडे मोकळ्या पाण्यात दुधे या मुलीसाठी काळ ठरलं.
कातरणी-विसापूर रस्त्यावर गावालगत असलेल्या बंधाऱ्याच्या बाजूला ५०० फुटावर दत्तू सोनवणे यांची वस्ती आहे. या बंधाऱ्यालगत त्यांच्या मुली शेळ्या चारण्यासह धुणे धुण्यासाठी नेहमी जात असतात.आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांच्या
मुली कल्याणी,तेजल,आदिती या तसेच त्यांचे बंधू सोमनाथ सोनवणे यांची मुलगी ऋतुजा या बंधार्याकडे धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या.याचदरम्यान इयत्ता पाचवीत शिकणारी ऋतुजा सोमनाथ सोनवणे (वय ११) आणि सहावीत शिकणारी कल्याणी दत्तू सोनवणे (वय १२) यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बंधाऱ्याच्या पाण्यात बुडाल्या.
ज्या ठिकाणी त्या बुडाल्या तेथे मोठे खड्डे असल्याचे सांगितले जाते.आपल्या बहिणी बुडत असल्याचे पाहून तेजल (वय १४) हिने पाण्यात उतरून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला,मात्र तीही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली.
याच दरम्यान रस्त्याने जाणाऱ्या ग्रामस्थांनी ती बुडत असल्याचे पाहून तिला पाण्यातून बाहेर काढले.या दोघी बुडाल्याचे उशिरा लक्षात आल्याने त्यांना बाहेर काढेपर्यंत त्या मृत झाल्या होत्या.
पाण्यातून काढलेल्या तेजल हिच्यावर ग्रामस्थांनी प्राथमिक उपचार करत पोटातून पाणी काढून तातडीने मनमाड येथे डॉ. शिंगी यांच्याकडे दाखल केले.वेळेत उपचार मिळाल्यामुळे तिची तब्येत सध्या व्यवस्थित आहे.
या मुली गावातीलच प्राथमिक तसेच माध्यमिक विद्यालयात शिकत होत्या.गरीब शेतकरी कुटुंबीयातील अतिशय सोज्वळ व शांत स्वभावाच्या अतिशय अल्पवयातील मुलींवर काळाने घाला घातल्याने संपूर्ण तालुक्यातून शोक व्यक्त होत आहे.रात्री नऊ वाजेच्या दरम्यान कातरणी येथे शोकाकुल वातावरनात या मुलींवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान,सोमनाथ सोनवणे यांचा अडीच वर्षाचा मुलाचा देखील आठ महिन्यापूर्वीच झोळीतून पडून मृत्त्यु झाला होता.वर्षाच्या आतच घरात दुसरी घटना घडल्याने या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये