मान्सून परतले म्हणजे पाऊस संपला असं नाही, एवढे महिने पाऊस कोसळणार Rain update
मान्सून परतले म्हणजे पाऊस संपला असं नाही, एवढे महिने पाऊस कोसळणार The rain will continue MAHARASHTRA

वेगवान मराठी / साहेबराव ठाकरे
पुणे, ता. 3 आॅक्टोबर 2024 – The rain will continue 2023 मध्ये महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचं असं चित्र कधीच महाराष्ट्राने पाहिलं नाही महाराष्ट्राचे थोडे जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ असल्यामुळे शेती पिका बरोबरच सर्वच उद्योगधंद्यांची संपूर्ण वाट लागली होती. Weather update
हाताला काम नाही शेतामध्ये पीक उभे नाही जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला होता चातकासारखी महाराष्ट्रातील जनता या वरून राजाची वाट पाहत होती की यंदाचा पावसाळा तरी चांगला होईल, आणि खरोखर वरून राजांने मनावर घेतलं आणि यंदा मात्र मनसोक्त महाराष्ट्रामध्ये हजेरी लावली. Rain update
जड पावलांनी महाराष्ट्रातून मान्सून Monsoonआता माघारी फिरल्यात जमा आहे. भारताच्या अनेक भागांमधून मान्सून माघारी फिरला आहे. महाराष्ट्र मधून ही एवढ्या एक-दोन दिवसात मान्सून पुन्हा परत निघून जाणार आहे. मात्र मान्सून जरी निघून जात असला तरी पाऊस मात्र थांबणार नाही.
ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) आणि मॉन्सूनोत्तर हंगामात (ऑक्टोबर ते डिसेंबर) दक्षिण भारतात सर्वाधिक पाऊस पडतो. यंदाच्या हंगामात दक्षिण भारतात ११२ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या कालावधीत महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाच्या अंदाजावरून स्पष्ट होत आहे.
पॅसिफिक महासागरातील अल निनोची स्थिती सध्या सामान्य आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात, पॅसिफिक महासागर ला निना टप्प्याकडे सरकण्याची 71% शक्यता असते. हिंदी महासागरातील हिंदी महासागर द्विध्रुव (IOD) तटस्थ राहण्याची शक्यता आहे.
