लाडक्या बहिणीच्या खात्यावरील पैसे टाकण्याचा निर्णय बदलला
लाडक्या बहिणीच्या खात्यावरील पैसे टाकण्याचा निर्णय बदलण्यात आला आहे. लवकरच महिलांना खुश कऱण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे माहिती समोर आली आहे. महिलांना आता यामुळे अजून आनंद होणार आहे.
वेगवान नाशिक
मुंबई, ता. 3 – विधानसभेची निवडणूक जशी जवळ आली आता शिताशी घोषणांची अंमलबजावणी वाढत चाललेली आहे महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. The decision to deposit the money in the beloved sister’s account changed
ही योजना सगळ्यात सुपरहिट ठरलेली आहे. कारण या योजनेच्या पैशांकडे सगळ्या महिलांबरोबर पुरुषांचे लक्ष लागून आहे. या योजने मध्ये आता बदल केला जाणार असून महिलांना एक प्रकारे एक तोफाच दिला जाणार असल्याचे माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी पुरवणी अर्थसंकल्पाचा भाग म्हणून “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही योजना” सुरू करण्याची घोषणा केली.
या योजनेतील ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता 10 ऑक्टोबरपर्यंत प्राप्त होईल. योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रितपणे महिलांना वितरित केले जातील. याशिवाय, दिवाळी बोनस म्हणून, या योजनेअंतर्गत महिलांना ₹3,000 मिळतील. अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील परळी येथील सभेत केली.
दोन्ही हप्ते एकत्र वितरित केले जातील
लाडली बहना योजनेंतर्गत महिलांना प्रथमच ₹3,000 देण्यात आले आहेत. अलीकडे, सप्टेंबरसाठी ₹1,500 वितरित केले गेले. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरपर्यंत भगिनींच्या खात्यात वर्ग केले जातील, असे मी आज तुम्हाला वचन देतो, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.
हा निधी थेट त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने महिलांनी काळजी करू नये, यावर त्यांनी भर दिला. ते पुढे म्हणाले की, आदिती तटकरे यांच्याशी बोललो, त्यांनी नमूद केले की या उपक्रमासाठी हजारो कोटींची गरज आहे आणि ती मुंबईला परतल्यानंतर आवश्यक व्यवस्था हाताळेल. आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन पवार यांनी दिले. त्यामुळे ज्या महिलांना पैसे मिळाले नसतील त्यांना आता थेट 7500 रुपये मिळणार आहे.