वेगवान नाशिक/Wegwan Nashik
विशेष प्रतिनिधी ३ ऑक्टोबर, – केंद्र सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला.
त्यामध्ये मराठी सोबतच पाली, बंगाली, आसाम,प्रकृत या भाषेसाठी केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आलयं तब्बल 12 कोटी जनता 12 कोटी मराठी माणूस आनंद साजरा करतोय.
प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये सध्या आनंदाचा वातावरणआहे. जो पाठपुरावा होतो त्याला कुठेतरी आता यश येताना पाहायला मिळतंय.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाचं प्रत्येक मराठी माणूस स्वागत करतोय. मराठीमध्ये अनेक मोठे महान साहित्यिक होऊन गेले त्यांनी देखील मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न केलेले होते.
त्याच प्रयत्नांना कुठेतरी यश आल्याचं आज तरी पाहायला मिळतात तर मराठी सोबतच पाली बंगाली असामी प्राकृत या भाषांना देखील अभिजात भाषेचा निर्णय दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
प्रतिक्रिया-
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने आज दिला. याबद्दल केंद्र सरकारचे मनःपूर्वक आभार व सर्व मराठी माणसांचे मनापासून अभिनंदन. गेले अनेक वर्ष मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे .यासाठी अनेक लोकांनी संघर्ष केला आहे. पाठपुरावा केला आहे. ज्ञानोबा- तुकोबाच्या भाषेवर आज अभिजात भाषा म्हणून सरकारने शिक्कामोर्तब केले. याचा खूप आनंद झाला. – संदीप जगताप, साहित्यिक.नाशिक.