बीग बॅासच्या घरातील सुरज चव्हाण असं करणार लग्न

वेगवान नाशिक
मुंबई ,ता. 3 – बिग बॉस हा मराठी शो सर्व सामान्य जनता पाहू लागलेले आहे. बिग बॉस मराठी या पाचव्या सीजन ने सर्वात मोठा धुमाकूळ घातलाय. बिग बॉसच्या पहिल्या दिवसापासून ते आज बिग बॉस शेवटला आलाय, म्हणजे हा सीझन संपत आलेला आहे. तरी प्रेक्षक हा शो पाहण्याचा सोडत नाहीये, याचं कारण या शोमध्ये जे सदस्य घेण्यात आलेले होते ते सदस्य सर्वसामान्य चेहरे होते यातले काही चेहरे वगळता.Suraj Chavan from Big Bass marathi house will marry
या शोमध्ये सगळ्यांचं आकर्षण ठरला तो म्हणजे बारामतीचा सुरज चव्हाण, ज्याने एका बुक्कीत प्रकर्षकांच्या मनावर टेंगूळ निर्माण केलं, असा सुरज चव्हाण आणि निकिता आंबोळी आणि अभिजीत सावंत यांचा संवाद प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला आहे आणि तो संवाद म्हणजे सुरज चव्हाण च्या लग्नासंदर्भातला आहे.
सुरज चव्हाण निकिता मुळे आणि अभिजीत सावंत हे गप्पा मारत बसलेले असतात ,6 ऑक्टोबर रोजी हा सीझनचा ग्रँड फिनेल पार पडणार आहे.
बिग बॉस मराठीच्या अनसीन अनदेखा’मध्ये अभिजीत सामंत सुरज चव्हाण आणि निकी तांबोळी हे गार्डन एरियात बसून लग्नाविषयी गप्पा मारताना दिसून आलेले आहेत .
सुरज ला यावेळी अभिजीत म्हणतोय की घराबाहेर पडल्यानंतर मी तुला फॉलो करणार जेव्हा तू लग्न करशील तेव्हा आम्हाला नक्की बोलव, त्यावर सुरज चव्हाण म्हणतो मी साध्या पद्धतीने लग्न करणार आहे. मी फक्त देवी समोर जोडीदाराच्या गळ्यात माळ घालीन .
हे ऐकल्यानंतर निकी त्याला म्हणते की तुला हळद ठेवावी लागणार आहे आणि आम्ही तुला हळद लावू आम्हाला हळदीचा कार्यक्रम हवाच आहे. यानंतर सुरज म्हणतो हो हळद सुपारीचा खेळ असणारच आहे. त्याशिवाय मज्जा येणार नाही. नक्की तू कधी लग्न करणार आहे तुझं वय पण झाला आहे.
यावर निकी म्हणते लग्नाच्या वयाचा काही विषय नाही, मी माझ्या आई वडिलांसोबत राहणार आहे. जेव्हाही माझं लग्न होईल तेव्हा मी माझ्या आई-वडिलांना सोबत घेऊन जाणार आहे. कारण मला मोठे कुटुंब आवडतं. मात्र सुरज चव्हाण एक साध्या पद्धतीने लग्न करणार आहे आणि तो देवी समोर फक्त आपल्या जोडीदाराच्या गळ्यात माळ घालणार आहे.
