घटस्थापनेच्या दिवशीच आदिवासी रण रागिनींनी केले अड्डे उध्वस्त !

उत्तम गायकर/ वेगवान नाशिक
इगतपुरी तालक्यातील वावी हर्ष येथील महिलांनी नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर घोटी पोलिसांच्या मदतीने अवैध दारूविक्रीचे अड्डे उध्वस्त केले असुन आदिवासी रणरागिणी व घोटी पोलीस यांचे इगतपुरी तालुक्यातील विशेष कौतुक होत आहे.
एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने मागील आठवड्यात त्र्यंबक आणि इगतपुरी तालुक्यातील अवैध दारू विक्री बाबत महिलांनी पोलिस अधिक्षक यांना निवेदन दिले होते. आणि दारू विक्री विरोधात आवाज उठवला होता. गेल्या एक आठवड्यात पासून अनेक ठिकाणी याच पद्धतीने घोटी पोलीस व अधिकारी हे मोहीम राबवित आहे. यामध्ये अनेक अड्डे उध्वस्त केले आहेत.
त्र्यंबक तालुक्यातील विजयनगर ग्राम पंचायतकडून कोणत्याही प्रकारचा विकास केला जात नाही.
ग्रामसेवक आणि उपसरपंच यांनी खोट्या सह्या करून आर्थिक अपहार केला आहे. असा आरोप करत ग्रामस्थांनी ग्राम पंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला.
