देवी मातेच्या आगमनप्रसंगी या महिला टाळपथकाने वेधले लक्ष
देवळालीच्या शिवनेरी स्पोर्ट्स व फ्रेंड सर्कलचा नवरात्र उत्सव

वेगवान नाशिक/Wegwan Nashik- विशेष प्रतिनिधी,दि.३ सप्टेंबर.-
देवळाली कॅम्प येथील लामरोडवरील शिवनेरी स्पोर्ट्स क्लब व लॅमरोड मित्र मंडळ आयोजित नवरात्र उत्सवानिमित्त घटस्थापनेसाठी तामिळनाडूतील मदुराई येथील मीनाक्षी मातेची मूर्तीची स्थापना करण्यात आली या निमित्ताने मातेच्या स्वागतासाठी येथील महिलांनी स्वयंस्फूर्तीने महिनाभर सराव करत आपले शिवनेरी महिला टाळपथक तयार केले. यावेळी मातेच्या आगमनासाठी महिलांनी डोक्यावर फेटा व महाराष्ट्रीयन हिरवी नऊवारी साडी परिधान करून टाळाच्या तालावर आकर्षक पावल्या खेळल्या. यामुळे रस्त्याने जा करणाऱ्या वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांचे लक्ष या महिला टाळा पथकाने वेधले. यावेळी आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवत या मातेच्या आगमनाचा सोहळा सुरू झाला. शिवनेरी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गोडसे माजी नगरसेविका आशा गोडसे, ज्ञानेश्वर गोडसे, सुदाम गायकवाड आदींसह क्लबचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
