आता महाराष्ट्रामध्ये हाबु आले, हे संकट कसं रोखणार
आता महाराष्ट्रामध्ये हाबु आले, हे संकट कसं रोखणार

वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला/ दिनांक.3 ऑक्टोंबर /महाराष्ट्रामध्ये संकटांचे काही कमी नाही कधी मुसळधार पाऊस तर कधी गारपीट तर कधी चक्रीवादळ तर कधी दुष्काळ, एवढ्या मोठं मोठ्या संकटांना महाराष्ट्रातला शेतकरी बेजार झालाय आणि याचा फटका सर्वांनाच बसतोय, शेती पिकाच नुकसान झाल्यामुळे अनुषंगाने शेतीचे बाजार भाव मोठ्या प्रमाणात वाढतात आणि याचा फटका ग्राहकांनाही बसतो आणि शेतकऱ्यांनाही कारण ज्यावेळी शेतकऱ्यांचे उत्पादन कमी येतं. त्यावेळी शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात पैसे होत नाही आणि ज्या वेळेस त्याचा फटका ग्राहकांनाही बसतो.
सध्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांवरती एक मोठं संकट घोंगावत आहे, कारण सध्या कांद्याचे बाजारभाव हे समाधानकारक असले तरी येणारा लाल कांदा मात्र भडकण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी शेतात कांदा लागवड केली असली तरी या कांद्यावरती मात्र हाबूंचा आक्रमण झालेला आहे. हा हबू म्हणजे एक प्रकारचा मोठा किडा आहे, हा किडा जमिनीमधून कांद्याचे मुळ नष्ट करतो, यामुळे कांद्याचे पीक पातळ पडत असल्यामुळे कांद्याची भर मोठ्या प्रमाणात निघणार नसून कांद्याचे उत्पादन घटणार आहे.
उत्पादन घटल्यामुळे कांद्याचे बाजार भाव यामुळे वाढतील मात्र शेतकऱ्यांना कमी उत्पादन निघाल्यामुळे कांद्याचे पाहिजे त्या प्रमाणात पैसे होणार नाही एवढं मोठं हे संकट आता शेतकऱ्यांपुढे उभा ठाकलेला आहे.
शेतीसाठी जागतिक तापमान वाढ याला कारणीभूत मानत असले तरी संपूर्ण जग निसर्गाच्या विविध कोपांना सातत्याने सामोरे जात आहे. पावसाळ्यात पाऊस एकाच वेळी बहुतांशी भागत पडत असे, आता एका भागात अतिवृष्टी तर अन्यत्र अवर्षण असे चित्र दिसते. वातावरणातही बदल होत आहे. बहुतांशी वेळी ढगाळ वातावरण असल्याचे जाणवते. हे वातावरण पिकांवर पडणारे विविध रोगांना पोषक असते. त्यामुळे शेती व्यावसायाला हे घातक ठरत आहे. यामुळे पिक पद्धत बदलण्याची गरज भासू लागली आहे.
त्यामुळे सतत बदलणाऱ्या वातावरणाचा कांदा पीका सह सर्व पिकांना बसत असून इतर पिकां सह कांदा पिकावर सुद्धा रोगांचा प्रार्दुभाव वाढला आहे त्यामुळे कांदा उत्पादन कमी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकरी भयभीत झाला आहे,
अचानक हवामानात झालेला बदल आणि त्या अनुषंगाने रोगांचा प्रादुर्भावदेखील मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा पीक सध्या धोक्यात आले आहे. पीक वाचविण्यासाठी महागडी औषधे फवारणी केली जात आहे.
अगोदर परतीच्या पावसाचा फटका बसल्याने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटातून सावरत आहे हातातोंडाशी आलेली पिके वाचवण्यासाठी धडपड करत असतानाच आता मात्र पहाटे पडणाऱ्या धुके व दवबिंदू यामुळे कांद्यावर रोगांचा प्रार्दुभाव वाढण्याची भीती वाढली आहे.
पहाटेच्या वेळेस दाट धुके पडत आहे, तर दिवसभर ढगाळ वातावरण राहत असल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. आता सर्वात मोठं संकट म्हणजे हा हाबु शेतक-यांचे पिक ठेवलं तरचं खरं नाहीतर कांद्याची पूर्णताह वाटचं लागली जाईल. कारण औषध फवराणी करुनही हे हबु मरत नसल्याचे काही शेतक-यांनी सांगितले.

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये