आर्थिक

आता लाडक्या बहिणींना पगार अन.. दिवाळीत मोबाईल बक्षीस मिळणार

आता लाडक्या बहिणींना पगार अन.. दिवाळीत मोबाईल बक्षीस मिळणार Now dear sisters will get salary and.. mobile prize in Diwali


वेगवान मिडीया / धिरेंद्र कुलकर्णी

मुंबई, ता. 3 आॅक्टोबर  2024 – विधानसभा जवळ आली आहे कोणत्याही क्षणाला घोषणा होऊ शकते या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले जात आहेत एक से बढकर एक निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्रातली जनता ही चकित झाली आहे आता विधानसभेमध्ये कोणता सरकार स्थापन होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रातलं लक्ष लागलेला आहे मात्र यामध्ये घोषणांचा पाऊस अजूनही सुरूच आहे.

 

महाराष्ट्र सरकारने अनेक योजना राबवलेल्या आहेत महायुती सरकारने लाडकी बहीण ही सर्वात मोठी योजना आणून लाखो रुपये हे महिलांना वाटप केले जात आहे. महिलांच्या खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये पडत असल्यामुळे महिलाही मोठ्या प्रमाणात खुश आहेत.

 

त्याचबरोबर महिलांचे पती हे पण आनंदी आहे कारण हा पैसा जरी महिलांच्या खात्यात येत असला तरी शेवटी त्या पैशाचे मालक हे या महिलांचे पतीच आहे म्हणजे लाडक्या बहिणीचे पतीचं सरकारच्या या पैशाचे मालक आहे.

 

जोपर्यंत विधानसभेची निवडणूक होत नाही तोपर्यंत कोण काय वाटप करेल याचा नेम नाही, आता महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये येत असले तरी आता नव्याने एक घोषणा करण्यात आलेली आहे.

 

दिवाळी सोबत निवडणुका तोंडावर असल्यामुळे अजित पवार यांनी पुन्हा एक-दोन महिन्याचे पैसे एकाच वेळी लाडक्या बहिणींना देणार देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

 

महिलांना ऍडव्हान्स मध्ये पैसे देण्याची ही दुसरीही वेळ आहे. जुलै आणि ऑगस्ट चे 3000 आणि सप्टेंबरचे पंधराशे आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चे तीन हजार असे  एकूण साडेसात हजार रुपये निवडणुका लागेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे.

तर दुसरीकडे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत असणाऱ्या 2400 महिलांना मोबाईल देण्याची घोषणा केली आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!