टोमॅटो आहे का कोणाकडे…कांद्याच्या भावाला टाकले मागे
टोमॅटो आहे का कोणाकडे...भाव पोहचाल एवढ्या रुपयांवर
वेगवान मराठी
नासिक, ता. 3 – कांद्याबरोबरच आता नाशिक सह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे उत्पादन घेतल्या जातं, मात्र ज्यावेळी शेतकऱ्यांकडे टोमॅटो असतो त्यावेळेस टोमॅटोचे भाव कोसळलेले असतात. Does anyone have a tomato…behind the onion brother
ज्यावेळेस शेतकऱ्यांचा टोमॅटो कमी होतो, त्यावेळेस टोमॅटोला चांगला बाजार भाव उपलब्ध होतात. भारतासह बांगलादेशाला टोमॅटोचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बाजार समितीमध्ये पुन्हा टोमॅटो ने उच्चंकी असा भाव घेतला आहे.
टोमॅटो प्रतीकॅरेटला एक हजार रुपये भाव क्रॉस करून पुढे निघून गेलेला आहे. टोमॅटोची लाली पुन्हा चमकली असली तरी शेतकऱ्यांच्या पदरात मात्र पैसे पडायला तयार नाहीये कारण शेतक-यांकडे आता टोमॅटो पाहिजे त्या प्रमाणात शिल्लक राहिले नाही.
आता ज्या शेतकऱ्यांकडे टोमॅटो शिल्लक आहे, त्यांचे मात्र चांदीत झाली आहे. कारण टोमॅटोला हजार रुपये कॅरेटचा भाव जर शेतकऱ्यांना मिळाला तर चांगले पैसे मिळणार आहे.
दीड महिन्यापासून नाशिक जिल्ह्यामध्ये पावसामुळे टोमॅटोचा पीक काही खराब झाला तर काही पीक संपुष्टात आलं . दीड महिन्यापासून सुरू झालेला टोमॅटोच्या हंगामात मध्यंतरी टोमॅटो 200 रुपयांवर आला होता.
मुळात लागवड कमी त्यात पंधरा दिवसापूर्वी झालेला पावसाचा टोमॅटो पिकाला फटका बसला. त्यामुळे बाजार समितीवरील आवक पन्नास हजार कॅरेटवर आली.
सोमवारी पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये टोमॅटोला मोठ्या प्रमाणात मागणी बाहेरून असल्यामुळे व्यापाऱ्यांची चढाओढ पाहण्यासाराखी होती. टोमॅटोची मागणी वाढली आहे. आणि त्यात फक्त नाशिक जिल्ह्य सोडता सध्या घाऊक असे टोमॅटोचे उत्पादन कोठे नसल्यामुळे पिंपळगाव मध्ये टोमॅटो लाली अजूनच चमकू लागली आहे.