मुख्यमंत्री शिंदे नाशिक मध्ये आले….सिडको फ्री होल्ड ची घोषणा करताच दुसऱ्या दिवशी निर्णय…..
मुख्यमंत्री शिंदे नाशिक मध्ये आले....सिडको फ्री होल्ड ची घोषणा करताच दुसऱ्या दिवशी निर्णय.....
वेगवान नाशिक /नाशिक नितीन चव्हाण ता:,३ ऑक्टोबर २०२४
सिडकोची घरे आणि प्लॉट्स लीज होल्ड (९९ वर्षे करार) मालमत्ता असल्याने घरधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. बांधकामासाठी बँका कर्ज देत नाही आणि परवानग्यांसाठी सिडको आणि महापालिकेच्या दारी चकरा माराव्या लागत होत्या
. घरावरही कर्ज मिळत नव्हते. त्यामुळे, सिडकोवासियांची घरे स्वतःच्या मालकीची व्हावी अशी मागणी पुढे येऊ लागली.
यासंदर्भात शिवसेना महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मी स्वतः सिडकोच्या घरात लहानाचा मोठा झालो. त्यामुळे, सिडकोच्या प्रश्नांची जाण मला होतीच त्यामुळेच, सिडकोची घरे फ्री होल्ड व्हावी यासाठी मीशिवसेनेच्या माध्यमातून अनेकदा पाठपुरावा केला.
माझी शिवसेना महानगरप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पहिली मागणी केली ती सिडकोची घरे फ्री होल्ड करण्याची. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी मला आश्वासितकेले होते.
सामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सिडकोचे अध्यक्ष ना. आ. संजय शिरसाठ, पालकमंत्री दादासाहेब भुसे आणि महायुतीतील सर्व घटक पक्षांचेमनःपूर्वक आभार अशी प्रतिक्रिया शिवसेना महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी व्यक्त केली आहे.
यापूर्वीच्या एकही मुख्यमंत्र्याने सिडकोला फ्री होल्ड करण्याचे आश्वासन देखील दिले नव्हते. मुळात, हा विषय श्रेय वादाचा नाही. पण, कामगार आणि सामान्यांची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडकोवासियांची तळमळ समजून घेतली तो लोकनाथ पदवी मिळालेल्या मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी. पालकमंत्री दादासाहेब भुसे यांनाही फ्री होल्डसाठी पाठपुरावा करण्याची विनंती करत होतो.
मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी विविध कामांसाठी भेटतांना तेच आम्हाला सांगायचे की, फ्री होल्डचे काम नक्की होणार. सिडकोच्या अध्यक्षपदी आ. संजय शिरसाठ यांची नियुक्ती झाल्यानंतर आमच्या आशा अधिक पल्लवित झाल्या.