वेगवान नाशिक/ एकनाथ भालेराव
येवला/ दिनांक 2 ऑक्टोंबर /येवला तालुका पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळायला सुरवात केली असून, चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील गुन्हेगारांना अटक केली आहे.
येवला, लासलगाव, नांदगाव, वैजापूर परिसरात जबरी चोरी चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतर जिल्ह्यातील संशयितांकडून ८ लाख ३५ रुपये किंमतीचे १०५ ग्रॅम वजनाचे सोन्याच्या दागिने व एका दुचाकीसह संजय रमेश बाबरे (२९, लोणी, ता. राहता) व राहूल रमेश मावस (२५, नादी ता. वैजापूर) या दोन संशयितांना अटक केल्याची माहिती येवला तालुका पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.
संशयितांनी दिली कबुली
सोनाली गोकुळ शेळके यांनी येवला तालुका पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून तपास सुरू असताना हे आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत.
येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलीक यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलीस स्टेशनचे पो. उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर, पोलि नाईक सचिन वैरागर, पंकज शिंदे, नितीन पानसरे, सागर बनकर यांचे पथक तपास करत असताना चोरी झालेल्या दुचाकी चोरीतील आरोपी संजय रमेश बाबरे, राहुल रमेश मावस यांनी जबरी चोरीचे गुन्हे केल्याची माहीती तपास पथकास मिळाली.
त्यांना ताब्यात घेऊन अधिक विचारणा केली असता त्यांनी येवला तालुका, लासलगाव, नांदगाव व वैजापूर पोलीस स्टेशन महिलांच्या गळ्यातील दागीने चोरी केल्याची कबुली दिली.
त्यांच्याकडून स्नॅचिंगचे ५ गुन्हे व १ दुचाकी चोरीचा गुन्हे उघडकीस आणण्यात येवला तालुका पोलिसांना यश आले आहे.
८ लाख ३५ हजार रु किमतीचा मुद्देमाल हस्तगत
संशयितांकडून ४ तोळे वजनाची २ लाख ८० हजार रुपयांची पोत, १ तोळे वजनाची ७० हजार रुपयांची पोत, १ तोळे वजनाची ७० हजार रुपयांची पोत, तीन तोळे वजनाचा २ लाख १० हजार रुपये किंमतीचा पोहेहार, दीड तोळा वजनाची १ लाख ५ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी व १ लाख किमतीची काळ्या रंगाची बजाज पल्सर असा एकूण ८ लाख ३५ हजार रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत होत आहे.
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये