नाशिकः ड्रोनमुळे मोहोळ उठलं…महिलां व पुरुष झाले आडवे
नाशिकः ड्रोन मुळे मोहोळ उठलं...काय फजिती एवढे लोक जागेवर बसले
वेगवान नाशिक
नाशिक, ता. 2 आॅक्टोबर 2024 – निसर्गावर जेव्हा माणूस अतिक्रमण करतो, त्यावेळेस त्याचे परिणाम मात्र आपल्याला भोगावे लागतात. नाशिक जिल्ह्यातल्या हरिहर गडाजवळ असाच एक प्रकार समोर आला आहे.
रॅपलिंगसाठी साठी गेलेल्या एका पर्यटकांच्या तुकडीवर मधमाशा तुटून पडल्याची घटना घडली आहे. ड्रोन उडवताना अचानक हे मोहोळ उठलं अशी माहिती समोर येत आहे .सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे.
या हल्ल्यामध्ये वीस ते पंचवीस जण जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे. घडलं कसं ते तुम्ही समजून घ्या, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या सीमेवर वरती एका दुर्गम जंगलामध्ये 350 फूट उंचीचा शितकडा धबधबा आहे.
कल्याण मधील एका संस्थेच्या माध्यमातून या धबधब्यावर मागील तीन महिन्यापासून सहाशी खेळाचा आयोजन केला जात आहे. अशाच एका गटाला घेऊन आयोजक रविवारी या धबधब्यावर गेले कल्याण गुजरात आणि दक्षिणेकडील राज्यातील काही लोकांचा यामध्ये समावेश होता.
गिर्यारोकाचा हा गट दुपारपर्यंत शितकडा धबधबा परिसरामध्ये सहाशी खेळाचे उद्देशाने पोहोचला धबधब्यावरून वाटर फॉल रिपॅलिंग करण्याची तयारी सुरू असताना या ठिकाणी निरीक्षकासाठी आयोजकाकडून ड्रोन उडवण्यात आल्याने मधमाशांचे एक मोठं मोठं आणि त्या मधमाशांनी या गटावर हल्ला केला.
जेव्हा हे मोहोळ उठले तेंव्हा मात्र सर्वांची पळापळ झाली. यामध्ये महिला आणि पुरुष असे 50 पेक्षा जास्त लोक यावेळी या ठिकाणी होते. रॅपलिंगसाठी हेल्मेट, हार्नेसवगैरे घालून तयार असलेल्या पर्यटकांची एकच पळापळ झाली. यावेळेस प्रसिक्षकांनी सर्वांना ओरडून धावपळ न करता आहात त्याच ठिकाणी जमीनीवर झोपा असं सांगितलं.