नाशिक ग्रामीण

येवला शहरातील शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे आज दिमाखदार सोहळ्यात होणार लोकार्पण

येवला शहरातील शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे आज दिमाखदार सोहळ्यात होणार लोकार्पण


 

वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव

येवला,दि.१ऑक्टोबर:-* येवला शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दि.२ ऑक्टोबर २०२४ रोजी) सायंकाळी ४ वाजता करण्यात येणार आहे. शिवसृष्टीचे लोकार्पण करण्यात आल्यानंतर जनता विद्यालयांच्या प्रांगणात भव्य दिव्य सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यास मतदारसंघातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष वसंत पवार यांनी केले आहे.

राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून येवला शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराजाच्या संकल्पनेवर आधारित सुमारे चार एकर जागेत भव्य शिवसृष्टी प्रकल्प साकारण्यात आला आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील विविध विकास कामांचे लोकार्पण आज (दि.२ ऑक्टोबर २०२४ रोजी) सायंकाळी ४.०० वाजता करण्यात येणार आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून या शिवसृष्टी प्रकल्पात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा १२ फुट उंचीचा ब्राँझ धातूचा पूर्णाकृती सिंहासनाधिष्टीत पुतळा बसविण्यात आला आहे.या प्रकल्पाची संपूर्ण रचना ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजदरबारा प्रमाणे असणार आहे. शिवसृष्टीचे भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे.या प्रवेशद्वाराला असलेले तीनही दरवाजे सागवानी लाकडाचे असुन एक एका दरवाजाचे वजन दोन टन इतके आहे.शिवसृष्टीत महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना आणि महाराजांचे सेनापती यांचे भित्त्तीचित्रे व शिल्प, शिवकालीन शस्त्रास्त्रांचे आणि पुस्तकांचे प्रदर्शन, शिवकालीन इतिहासाची माहिती देण्यासाठी ऑडीओ व्हिज्युअल हॉल,सुरेख गार्डन, बुरुजांचा समावेश असलेली संरक्षण भिंत आणि नयनरम्य कारंजे यासह विविध कामांचा समावेश असणार आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकल्प राजस्थान येथून घडवून आणलेल्या दगडात तेथील कारागिरांच्या माध्यमातून साकारण्यात येत आहे.

*असा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्टीत पुतळा*
शिवसृष्टीत बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा १२ फूटी सिंहासनाधिष्टीत ब्राँझ धातूचा आहे.रायगडावरील तसेच विधानभवनात बसविण्यात आलेल्या पुतळ्यासारखाच हा पुतळा आहे.या पुतळ्याची रुंदी ८ फुट असून पुतळ्याची उंची १२ फुट असणार आहे. पुतळ्याचे एकूण वजन ५ टन इतके आहे. या पुतळयासाठी १५ फुट खोलवरुन कॉक्रीट चौथरा उभारण्यात आला आहे. यावर राजस्थान येथून घडवलेले नॅचरल स्टोन व मार्बलचा वापर करण्यात आला आहे.हा पुतळा कुडाळ येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार बाळकृष्ण (दाजी) पांचाळ आणि नंदु पांचाळ यांच्या हस्ते साकारण्यात आले आहे.

*सोहळ्याचे हे असणार मुख्य आकर्षण*
येवला शिवसृष्टी लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांचे धगधगते चरित्र दाखविणाऱ्या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात सुप्रसिद्ध अभिनेते भूषण प्रधान,अविनाश नारकर, सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, सुप्रसिद्ध शाहीर प्रा.डॉ.गणेश चंदनशीवे यांचे सादरीकरण असणार आहे


एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!