गोडतेल तेल आता पेट्रोल पेक्षा काही पट झाले महाग

वेगवान मिडीया / दिपक पांड्या
नवी दिल्ली, ता. 1 आॅक्टोबर 2024 – Edible oil is expensive सणासुदीच्या काळात लोकांमध्ये उत्साह वाढतो. अनेकांना बोनस मिळतात, ज्यामुळे बाजारात खरेदीला चालना मिळते. मात्र, सणासुदीचा हंगाम जवळ आल्याने सर्वसामान्यांच्या खिशाचं कापला गेला आहे . घरात मध्ये तुम्ही सगळं मॅनेज करु शकतात. सांगायचे असे की तुम्हाला जर खिशात पैसे नसतील तर एखांदे काम नंतर करु म्हणून वेळ मारुन नेतात मात्र खाद्य तेल म्हणजे गोडतेला बाबत तुम्हाला तसं करता येत नाही. गोडतेल हे रोजच्या जीवनातील सर्वात महत्वाचे मानले जाते. sweet-oil-is-now-several-times-more-expensive-than-petrol
मात्र याच गोडतेलाने आता तुमचा खिसा कापला आहे. 105 रुपयांवर असलेले सोयाबीचे गोडतेल आता पेट्रोल ला पण मागे टाकून बरेच पुढे निघून गेले आहे.
सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेची घाई आहे. आता गणेश चतुर्थी संपल्यानंतर आता नवरात्री, दसरा, दिवाळी या सणांची लोक आतुरतेने वाट पाहत असले तरी महागाईही डोंगर मात्र वाढू लागलेला आहे. सण-उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात मिठाई आणि फराळ बनवला जातो आणि या काळात तेल कंपन्यांनी स्वयंपाकाच्या तेलाच्या दरात वाढ केली आहे.
सणासुदीच्या काळात महागाई वाढते
केंद्र सरकारने आयात शुल्क कमी केले असले तरी स्वयंपाकाच्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे सरकारने संबंधित कंपन्यांकडून स्पष्टीकरण मागवले आहे. सरकारने तेल कंपन्यांना आयात केलेल्या तेलाच्या मुबलक साठ्यामुळे किंमत स्थिर ठेवण्याचा सल्ला दिला असला तरी, किमती अजूनही वाढल्या आहेत. अलीकडे, 14 सप्टेंबर रोजी सरकारने देशांतर्गत तेलबियांच्या किमतींना आधार देण्यासाठी विविध स्वयंपाकाच्या तेलांवर सीमाशुल्क वाढवले. किरकोळ किमतींमध्ये वाढ होणार नाही याची खात्री करण्यासाठी 17 सप्टेंबर रोजी अन्न मंत्रालयाने स्वयंपाकाच्या तेल उद्योगाच्या प्रतिनिधींसोबत बैठक बोलावली.
तेल कंपन्यांना सरकारचे निर्देश
आगामी सणासुदीच्या काळात किरकोळ किमती स्थिर ठेवण्याचे सरकारचे निर्देश असतानाही सीमाशुल्क वाढीच्या घोषणेनंतर दर का वाढले? अन्न मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले की, “संबंधित कंपन्यांना दरवाढीची कारणे स्पष्ट करण्यास सांगितले आहे.” मंत्रालयाने असेही म्हटले आहे की कमी शुल्कात आयात केलेले साठे 45 ते 50 दिवस टिकू शकतात, त्यामुळे कंपन्यांनी कमाल किरकोळ किमती वाढवणे टाळावे. शिवाय, सणासुदीचा हंगाम जवळ असताना आणि मागणी वाढण्याची अपेक्षा असताना ही दरवाढ झाली आहे.
स्वयंपाकाच्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत
किरकोळ बाजारात मात्र गोडतेल विक्री करणा-या दुकानरांना आजचे भाव विचारले असता त्यांनी सांगितेल की गेल्या 20 दिवसापूर्वी गोडतेल हे 105 रुपयांवर होते. मात्र हळुहळु ते वाढतचं गेले आहे. आज त्याचा किरकोळ विक्रीचा भाव काही ठिकाणी 135 तर काही ठिकाणी 145 रुपये इतका आहे. सोयाबीनेच गोडतेल तर 140 रुपये दराने ग्राहकांना घ्यावे लागते. शेंगदाण तेलाचे भावांमध्ये 200 रुपयापेक्षा वरती विक्री होत आहे. तर सुर्यफुलाचे तेल हे 145 रुपयाने किरोळ बाजारामध्ये खाद्य तेलाची विक्री होत आहे. त्यामुळे खाण्याचे तेलाची स्थिती पाहयला गेलं तर पेट्रोलला मागे टाकून पुढे भरारी घेतली आहे.
