नाशिक शहर

जयभवानीरोडच्या श्री तुळजा भवानी मंदिरात नवरात्रोत्सवात खालील उपक्रम

भाविकांच्या दर्शनासाठी २४ तास खुले राहणार मंदिर


वेगवान नाशिक / Wegwan Nashik

विशेष प्रतिनिधी

नाशिकरोडच्या जयभवानी रोड येथे नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य अशा श्री तुळजा भवानी मंदिरात देवस्थानतर्फे नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. विश्वस्त आणि पदाधिका-यांनी त्याची जय्यत तयारी केली आहे. नवरात्रोत्सवात मंदिर भाविकांसाठी चोवीस(२४) तास खुले राहणार आहे.

घटनास्थापना ३ ऑक्टोबरला आहे. त्या तारखेपासून दस-यापर्यंत म्हणजेच १२ ऑक्टोबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होतील. चरण तीर्थ पहाटे तीन वाजता तर अभिषेक, महापूजा पहाटे तीन ते साडेपाच दरम्यान होईल. पहाटे साडे पाचला महाआरती तर दुपारी बाराला देवीला मध्यान भोग अर्पण केला जाईल. सायंकाळी आठला महाआरती होईल. प्रक्षाळ पूजा रात्री दहा ते साडेदहा दरम्यान होईल. नियमितपणे *दुर्गा सप्तशती पाठ पठण दुपारी एक ते तीन वाजेला होईल*.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

मंदिरातील कार्यक्रम असे – २४ सप्टेंबर- सायंकाळी देवीची मंचकी निद्रा

३ ऑक्टो.- पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना आणि दुपारी बाराला घटस्थापना व रात्री छबीना. ४ ते ६ ऑक्टो.-देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबीना. ७ ऑक्टो.- देवीची नित्योपचार पूजा, ललिता पंचमी, रथ अलंकार महापूजा व रात्री छबीना. ८ ऑक्टो.-मुरली अलंकार महापूजा व रात्री छबीना, ९ ऑक्टो.- देवीची शेषशाही अलंकार महापूजा व रात्री छबीना, १० ऑक्टो. -भवानी तलावर अलंकार महापूजा, ११ ऑक्टो.- दुर्गाष्टमी व महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा, सकाळी सात वाजता होम हवनास प्रारंभ, दुपारी सव्वा बाराला पूर्णाहुती, १२ ऑक्टो.- दुपारी बाराला होम व धार्मिक विधी, विजया दशमी उत्सव, सिमोल्लंघन, रात्री पालखीची मिरवणूक. १३ ऑक्टो.- मंदिराभोवती मिरवणूक, मंचकी निद्रा, शमी पूजन, १६ ऑक्टो.- कोजागिरी पोर्णिमा उत्सव, १७ ऑक्टो.- देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना, रात्री छबीना व जोगवा

१८ ऑक्टो.-देवीची नित्योपचार पूजा, महाप्रसाद.

मंदिर संस्थानतर्फे भाविकांसाठी अनेक विकासात्मक कामे सुरु आहेत. त्यासाठी भाविकांनी सढळ हस्ते मदत करावी, देणगी द्यावी, नवरात्रोत्सवातील कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्तांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!