
वेगवान नाशिक/Nashik,अविनाश पारखे, मनमाड,नांदगाव,दि.1 ऑक्टोबर-
मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदुर-पुणे महामार्गावर सानप कॉम्प्लेक्स समोर मालेगावकडुन येवल्याच्या दिशेने लोखंडी पाईप घेऊन जाणाऱ्या कंटेनर ट्रक क्रमांक जीजे 12 बीएक्स 1228 खाली सापडुन अशोक शिंदे,रा.छत्रपती शिवाजी महाराज चौक,वय 66 यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.

Shri.Avinash Parkhe
Working with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right…what is truth…