वेगवान नाशिक / धिरेंद्र कुलकर्णी
नागूपर, ता. 1 आॅक्टोबर 2024- एक काळा असा होता की एसटी बस शिवाय प्रवास नव्हता मात्र जसजशी प्रगती वाढत गेली तसतसं तुमच्याकडे विविध वाहने उपलब्ध झाली.
आज तुम्ही फॉर्च्यूनर मध्ये फिरत आहे मात्र सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांना प्रवास करण्यासाठी एसटी बस किंवा शिवनेरी नवीन आधुनिक आलेले बसचा आधार घ्यावा लागतो.
तुम्ही कितीही मोठे असले तरी तुम्हाला बसमधून फिरावे लागतेच. मात्र बस मधील प्रवास बोरींग न होता तो दर्जेदार व्हा व एक प्रकारे प्रवाशांची ठेप ठेवता यावी म्हणजे त्यांचा चांगला पाहुणचार करण्यासाठी आता तुम्हाला बस मध्ये सुंदर महिला तुमच्यासोबत प्रवासासाठी उपलब्ध होणार आहे.
बसमध्ये प्रवाशांची संख्या वाढावी बस मधून प्रवास आनंदी व्हावा या उद्देशाने आणि लोकांचा सन्मान वाढावा यासाठी आता बस मध्ये तुम्हाला सुंदरी दिसणार आहेत म्हणजे सुंदर महिला -आता तुम्हाला या बसमधून प्रवास करताना तुमच्या सोबत असतील.
विमानातील एअर होस्टेसच्या भूमिकेप्रमाणेच एसटी महामंडळ ‘शिवनेरी सुंदरी’ सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. ही सेवा एसटीच्या ई-शिवनेरी बसेसवर उपलब्ध असेल.
मुंबई-पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मदत करण्यासाठी “शिवनेरी सुंदरी” परिचारक नियुक्त केले जातील. महत्त्वाचे म्हणजे या सुधारित सेवेसाठी प्रवाशांच्या तिकिटांवर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. या उपक्रमाला एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी मान्यता दिली आहे.