नाशिक ग्रामीण
नाशिक जिल्ह्यात आल्या खुप साऱ्या कंपन्या, कारण होत…
वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : ग्रामीण भागातील तरुणांना नोकरी व्यवसाय मिळवून देत त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे, या उद्देशाने युवा नेते केदा आहेर यांच्या संकल्पनेतून चांदवड शहरातील रेणुका लॉन्स येथे महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते.
मेळाव्यासाठी तीन हजार उमेदवारांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले होते. प्रत्यक्ष २४२२ उमेदवारांनी मुलाखत प्रक्रियेत सहभाग नोंदवला. यातील १३५८ उमेदवारांना नोकरीची संधी मिळाली असून त्यांना लगेच नियुक्तीपत्र देण्यात आले. उर्वरित उमेदवारांना जॉब कार्ड चे वाटप करण्यात आले. दिव्यांग उमेदवारांसाठी विशेष प्राधान्य देण्यात आले होते.
चांदवड देवळा तालुक्यासह इतर तालुक्यातील देखील तरुणांनी या रोजगार मेळाव्यात मुलाखत देत आपलं नशीब आजमावले. मेळाव्यासाठी बॉश, टाटा, एसबीआय , वोडाफोन, एअरटेल याशिवाय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामवंत ६० कंपन्या सहभागी होत्या.
नोकरीमध्ये रस नसलेल्या उमेदवारांसाठी व स्वयंरोजगार निर्मिती करणाऱ्या युवकांसाठी प्रसिद्ध you tube प्रोग्रामर व इन्स्टा प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या प्रसिद्ध स्टार उपलब्ध करून देण्यात आले. त्यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी स्वयंरोजगार महामंडळाचे अधिकारी यांनी कर्ज योजना संदर्भात तसेच उपस्थित कंपन्यांचे प्रतिनिधी यांनी देखील मार्गदर्शन केले.
मेळाव्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केदा आहेर यांच्या उपक्रमाचे कौतुक करत ग्रामीण भागातील ही सर्वात मोठी रोजगार संधी उपलब्ध करून दिल्याने गोरगरिबांच्या मुलांसाठी फार उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. युवकांनी नोकरीच्या संधीसाठी संघर्ष करणं सतत चालू ठेवावे व धीराने आणि विश्वासाने अशा रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन मुलाखतीस सामोरे जावे असे देखील त्यांनी युवकांना संबोधित केले.
राजकारणाऐवजी समाजासाठी उपयुक्त काम करण्याचा माझा नेहमी मानस असतो.गोरगरिबाच्या मुलांना नोकरी व्यवसाय मिळवून त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे. युवकांचे सशक्तीकरण करून त्यांना आत्मनिर्भर करणे हा माझा मुख्य हेतू आहे. युवकांच्या उज्वल भविष्यासाठी असे उपक्रम पुढे देखील नियमित राबवले जातील असा विश्वास यावेळी केदा आहेर यांनी उपस्थितांना दिला.
कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर चांदवडचे भाजप नेते डॉ. आत्माराम कुंभार्डे, प्रशांत पाटील, वाल्मिक वानखेडे, प्रशांत ठाकरे, जगन गांगुर्डे, महावीर संकलेच्या, ताराचंद आहीरे, सुनील शेलार, प्रशांत ठाकरे, प्रशांत वैद्य, महेंद्र कार्डिले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास विनोद पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मुरलीधर भामरे यांनी केले.
गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, वेगवान न्यूज, कसमादे मीडिया, माय महानगर, नाशिक सिटी न्युज, जागर जनस्थान, इंडिया दर्पण, बी.टी.एल. न्यूज मराठी इत्यादी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. मुख्यतः राजकारण, शेती, क्राईम, विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.