मागेल त्याला सौरपंप योजनेत सौरपंप कसा मिळणार घ्या जाणून
वेगवान नाशिक/अतुल सुर्यवंशी
सटाणा (दि.०१): मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून तात्काळ सौर कृषी पंप देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे सोयीचे व्हावे वीजबिलापासून मुक्तता मिळावी. भारनियमानाची चिंता नसावी या उद्देशाने कृषी वापरासाठी सौर कृषीपंप देणारी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ राज्य शासनाने जाहीर केली आहे.
शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी महावितरण वर सोपविले आहे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांना रात्रीचे पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागणार नाही भार नियमनाची समस्या संपून संपूर्ण आठ तास नियमित पाणी मिळण्यास मदत होईल.
या योजनेचे लाभार्थी निवडीचे निकष महावितरणने निश्चित केले आहेत. अडीच एकर पर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यास तीन अश्वशक्तीचा सौर कृषीपंप दोन एकर पेक्षा जास्त ते पाच एकर पर्यंत जमीन असल्यास शेतकऱ्यास पाच अश्वशक्ती क्षमतेचा आणि पाच एकर वरील शेतकऱ्यांसाठी ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप दिला जाईल. सौरऊर्जेचे महत्त्व लक्षात घेऊन शासनाद्वारे महाराष्ट्रात 2015 पासून सौर कृषी पंपांच्या विविध योजना आहेत. यापूर्वी अटल सौर कृषी पंप योजना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना होती प्रधानमंत्री कुसुम घटक व योजनेत सौर कृषी पंप आहे राज्यात आत्तापर्यंत दोन 63156 कृषीपंप बसवलेले आहेत.