नाशिक जिल्ह्यातील या शहारात तुम्ही मोकळे फिरून दाखवा, तुमचे लचके तुटलेच
नाशिक जिल्ह्यातील या शहारात तुम्ही मोकळे फिरून दाखवा, तुमचे लचके तुटलेच

एकनाथ भालेराव / वेगवान नाशिक
येवला, ता. 1 ऑक्टोंबर 2024 – दोन मोकाट जनावरांच्या झुंझीत एका मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाला असून मोकाट कुत्र्यांकडून शहरातील दोघांना चावा घेतला आहे.यामुळे मोकाट जनावरांप्रश्नी नगरपालिकेच्या भूमिकेबद्दल नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
जर तुम्ही येवल्यामध्ये येणार असला तर ही बातमी वाचा
त्यातच येथील ग्रामीण रुग्णालयात रेबीज लस उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.
उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा असलेल्या या रुग्णालयात साधी रेबीजची लस उपलब्ध नसल्याने येथे होणाऱ्या उपचारांचा अंदाज येत असल्याची भावना रुग्णांनी व्यक्त केली आहे
येवला शहरभर मोकाट जनावरांसह मोकाट कुत्र्यांचा ही संचार वाढला असून हे वळू कुठेही एकमेकांमध्ये भिडतात आणि त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
शहरासह महामार्ग तसेच नववासाहतीत या जनावरांच्या वावरामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून नगरपालिका प्रशासनाला याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येते.
नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही याकडे लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येत आहे. नववसाहतीमध्ये भर रस्त्यात गाई उभ्या राहतात तसेच रात्री रस्त्यावर बसतात.
शिवाय कॉलनी परिसरात प्रचंड घाण या गाईंमुळे होत असल्याने नागरिक त्रस्त झाले असून अनेक घटना होऊन वाहनांचे तसेच भाजीपाला दुकानांचे मोठे नुकसान अनेकदा झाले आहे.
नाशिक राज्यमार्ग,बाजार समिती परीसर, वैजापूर रोड,पारेगाव रोड या परिसरात मोकाट जनावरे अनेकदा रस्त्याच्या मधोमध बसलेले असल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो.
पारेगाव रोड विभागात रस्त्यावरच मोकाट जनावरे बसत असल्याने नागरिकांना येजा करणे देखील मुश्कील होते.
मोकाट जनावरांमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासन मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का? असा सूर दुकानदार व नागरिकांमधून येत आहे.
मागील आठवड्यात अंगणगावजवळ नाशिक संभाजीनगर महामार्गावर दोन मोकाट वळूची तुफान झुंज झाली.हे वळू अनेक वेळ एकमेकांवर तुटून पडले होते.
या दोघांच्या झुंजित त्यातील एक जनावर बेशुद्ध होऊन रस्त्यातच पडले होते.देवगावहून येवल्याकडे येत असलेले दुचाकीस्वार देवगाव येथील मुजाहिद रमजान शेख गाडीवरून जात असताना जनावरांची झुंज दुचाकीवर गेल्याने ते जखमी होत रस्त्यावर पडले होते.त्यांना तत्काळ स्थानिकांनी रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल केले होते
त्यांच्यावर कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले आहे.तरुणाच्या या निधनामुळे मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
◆कुत्र्याचा दोन जणांना घेतला चावा
तुम्ही येवला शहरामध्ये येणार असेल तर सावधं व्हा कारण येवल्यामध्ये हे कुत्रे दुचाकीस्वार अथवा पायी चालणा-या लोकांवर हल्ला करतात. नुकतेच दोन जणांना मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने पुन्हा एकदा मोकाट जनावरांसोबत कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिक रोष व्यक्त करत आहे.
मुलतानपुरा येथील अफजल शेख तसेच अंदरसुल येथील वयोवृद्ध नागरिक शहराच्या बुंदेलपुरा भागात असताना मोकाट कुत्र्यांनी त्यांना जावा घेतला.
उपचारासाठी त्यांनी तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालय गाठले.मात्र येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात रॅबिज इंजेक्शन शिल्लक नसल्याने अक्षरशः या रुग्णांना माघारी फिरावे लागले रेबीज इंजेक्शन कधी असते तर कधी नसते अशी परिस्थिती येवल्यातील उपजिल्हा रुग्णालयाची झाली आहे.त्यामुळे जनतेचे आरोग्य वाऱ्यावर सोडले की काय असा सवाल उपस्थित होत आहे.

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये