शेतक-यांना लवकरचं वीजचे बील येणार ते चुकणार नाही
शेतक-यांना लवकरचं वीजचे बील येणार ते चुकणार नाही Farmers will not miss electricity bills soon
वेगवान नाशिक / साहेबराव ठाकरे
मुंबई, ता. 2 आॅक्टोबर 2024- (आनलाईन डेक्स ) – Electricity bill महाराष्ट्रात योजनांचा पाऊस सुरू आहे योजनांचा पाऊस इतका पडतोय की तो महाराष्ट्राला झेपत नाहीये, महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळण्यासाठी अनेक आंदोलन मोर्चा करावी लागली होती. मात्र आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पुढचं वीज बिल मात्र येणार आहे. आणि ते कशा पद्धतीने आहे, जाणून घ्या.
महाराष्ट्रातील शेतक-यांना दिवसा वीज मिळत नव्हती. जेंव्हा वीज असायची तेंव्हा विहीरी कोरड्या ठाक आणि जेंव्हा विहीरीत पाणी तेंव्हा वीज पंप सुरु होऊन पाच मिनिट होत नाही तोच विद्युत पुरवठा खंडीत होत असे, त्यामुळे शेतक-याच्या वाफ्यात पाणी जाते, ना, कुठं वीज गायब होत असे.
शेतीच्या हंगामात शेतकरी याला मोठ्या प्रमाणात वैतागला होता. शेतक-यांनी सुरळीत लाईट मिळावी म्हणून अनेक ठिकाणी महाराष्ट्रात मोर्चे आंदोलन काढली. विद्युत कंपनी खाजगीकरणाच्या दिशेने वाटचाल करत असल्याच्या अनेक चर्चा झाल्या…मात्र त्यामध्ये आता सरकारने महाराष्ट्रात एक मोठा निर्णय घेतला तो म्हणजे वीज बील माफ करण्याचा. परंतु शेतक-यांना पुढील वीज बिल येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितले.
महाराष्ट्रात, राज्य सरकारने 2024-25 या आर्थिक वर्षात शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण वीज बिल माफी सुरू केली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलेल्या या निर्णयामुळे सुमारे ४४ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजने” अंतर्गत, सरकार 7.5 हॉर्सपॉवर पर्यंतचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांचे सर्व प्रलंबित वीज देय माफ करत आहे.
विशेषत: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांवरील आर्थिक भार हलका करण्याच्या उद्देशाने या योजनेचा उद्देश आहे. या उपक्रमासाठी 14,761 कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद करण्यात आली असून, पात्र शेतकऱ्यांना मोफत वीज मिळण्याची हमी देण्यात आली आहे.
हा निर्णय कृषी क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी सरकारच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे, ज्यामध्ये बियाण्यांसाठी सबसिडी, पीक विमा आणि हवामान बदलामुळे पिकांच्या नुकसानीसाठी अतिरिक्त भरपाई समाविष्ट आहे.
येत्या आठ दहा दिवसांत शेतक-यांना शुन्य रुपये वीजबिल येणार तर बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसेही पाठवणार आहे.. अशी ग्वाही जनसन्मान यात्रेत अजित पवारांनी दिलीये.. बहिणींना दिवाळीची ओवाळणी देणार म्हणजे देणार, हा अजित पवार शब्दाचा पक्का असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय..
याचा अर्थ तुम्हाला वीज बिल येणार आहे. मात्र ते शुन्य असणार आहे. कारण वीज बील येणार नाही असं नाही. ते येणार आहे. फक्त शुन्य होऊन हे आपण समजून घेतले पाहिजेत.