दादर ते भुसावळ दरम्यान १०४ विशेष प्रवासी रेल्वे
वेगवान नाशिक/ Wegwan Nashik
विशेष प्रतिनिधी – रेल्वे विशेष गाड्यांची प्रचंड मागणी लक्षात घेता, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी १०४ सेवांसाठी खालील विशेष गाड्यांची सेवा सुरू ठेवणार आहे.
दादर – भुसावळ – दादर त्रि-साप्ताहिक विशेष (७८ सेवा)
09051 त्रि-साप्ताहिक विशेष दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी दि. ०१.१०.२०२४ ते दि. ३०.१२.२०२४ (३९ सेवा) पर्यंत चालविण्यासाठी विस्तारित करण्यात येत आहे.
09052 त्रि-साप्ताहिक विशेष दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी दि. ०१.१०.२०२४ ते दि. ३०.१२.२०२४ (३९ फेऱ्या) पर्यंत चालविण्यासाठी विस्तारित करण्यात येत आहे.
दादर -भुसावळ – दादर साप्ताहिक विशेष (२६ सेवा)
09049 साप्ताहिक विशेष दि. ०४.१०.२०२४ ते दि. २७.१२.२०२४ (१३ फेऱ्या) पर्यंत दर शुक्रवारी चालवण्यासाठी विस्तारित करण्यात येत आहे.
09050 साप्ताहिक विशेष दि. ०४.१०.२०२४ ते दि. २७.१२.२०२४ (१३ फेऱ्या) पर्यंत दर शुक्रवारी चालवण्यासाठी विस्तारित करण्यात येत आहे. वर नमूद केलेल्या गाड्यांच्या वेळा, संरचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
आरक्षण: सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर विशेष शुल्कासह विशेष ट्रेनच्या सर्व विस्तारित फेऱ्यांसाठी बुकिंग आधीच सुरू आहे.
या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.