नाशिक ग्रामीण
नाशिकचे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आता शासनाने स्वाताच्या घेतले ताब्यात
नाशिकचे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आता शासनाने स्वाताच्या घेतले ताब्यात

वेगवान नाशिक / धिरेंद्र कुलकर्णी
मुंबई, ता. 30 नाशिकचे वैद्यकीय पदवी महाविद्यालय व रुग्णालय शासनाकडे घेण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
शंभर विद्यार्थ्यांचे तसेच ४३० रुग्ण खाटांचे हे रुग्णालय स्थापन करण्यास २०२१ मध्ये मान्यता देण्यात आली होती. आता या महाविद्यालयाचे नाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक असे करण्यात येईल.
तर महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था, नाशिक ही संस्था महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नियंत्रणात राहील. या रुग्णालयासाठी ६३२ कोटी ९७ लाख खर्चास मान्यता देण्यात आली.
