येवला मतदारसंघात एवढे कोटी रुपये आले, काय काय योजना राबविणार पहा
येवला मतदारसंघात एवढे कोटी रुपये आले, काय काय योजना राबविणार पहा
- वेगवान नाशिक/ एकनाथ भालेराव
येवला,दि.29सप्टेंबर:- राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला मतदारसंघात आपत्ती सौम्यीकरणच्या २२ कोटी २५ लक्ष रुपयांच्या विविध कामांना मंजूरी मिळाली आहे. यामध्ये पुर प्रतिबंधक व एचपीडी बांधकाम करणे या कामांचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासानच्या वतीने १५ वित्त आयोगाने मंजूर केलेल्या राज्य आपत्ती सौम्यीकरण निधीच्या माध्यमातून राज्यातील आपत्ती सौम्यीकरण अंतर्गत येवला मतदारसंघातील वीज कोसळणे व पुर प्रतिबंधक कामांना मंजूरी देण्यात आली आहे.
यामध्ये निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे डावी बाजू येथे पुर प्रतिबंधक काम करण्यासाठी ४ कोटी ८६ लाख, कानळद उजवी बाजू येथे प्रतिबंधक काम करण्यासाठी ४ कोटी ८१ लाख, खेडलेझुंगे उजवी बाजू येथे पुर प्रतिबंधक काम करण्यासाठी ४ कोटी ८२ लाख, कानळद डावी बाजू येथे पुर प्रतिबंधक काम करण्यासाठी ४ कोटी ८१ लाख तर गोदावरी डावा तट कालव्यावर एचपीडी बांधकाम करण्यासाठी २ कोटी ९५ लाख रुपये असे एकूण २२ कोटी २५ लाख रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली आहे. या पुर प्रतिबंधक कामांमुळे पुर परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी मदत होणार आहे.
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये