नाशिकः लक्ष देत नसल्याने “जे होईले ते होईल” आता अधिकारी ठोकणार !
![](https://wegwannashik.com/wp-content/uploads/2024/09/अधिकारीचं-ठोकणार-780x470.jpg)
- वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर : दि.२९ सप्टेंबर -सिन्नर तालुक्यातील वावी टोल नाका येथे सामाजिक कार्यकर्ते दीपक वेलजाळी यांचे उपोषण व आंदोलन अनेक दिवसांपासून चालू आहे . या टोल नाक्यावर अनेक कामगारा सह नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. किड्या मुंग्यासारखे माणसं मृत्युमुखी पडले आहेत. कारण या टोल नाक्याचं पूर्ण काम झालेले नाही. कुठले सेफ्टी दिशादर्शक फलक लावलेले नाही ना कुठले रिपीटर लावले . त्यामुळे या टोल नाक्यावर अपघाताचं प्रमाण जास्त असल्याने टोल नाका चे काम सुरू असताना अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामध्ये अल्पवयीन तसेच वयोवृद्ध व ज्येष्ठ ही होते .
दोन्ही साईड पट्ट्यांना काम झालेले नाही. पर्यावरण संतुलित राखण्यासाठी झाडे लावलेले नाही. टोल नाक्याला कुठला संवरक्षक भिंती नाही . शेड नसल्यामुळे कामगार हे उन्हातानात काम करतात त्यांना कुठली सुट्टी नाही. कुठले बूट नाही. हेल्मेट नाही व आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांना कुठली भरपाई नाही .योग्य तो गुन्हा दाखल नाही.
या सर्व मागण्या साठी सामाजिक कार्यकर्ते दीपक वेलजाळी उपोषण करत आहे. त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष दत्तू भाऊ लोंढे यांनी प्रहार चे तालुकाध्यक्ष कैलास दातीर व दिव्यांग कार्याध्यक्ष जिल्हा भाऊसाहेब सांगळे व महिला अध्यक्ष पुष्पा भोसले महिला शहराध्यक्ष संगीता आगळे यांना पाचारण करून होणाऱ्या अन्यायाची माहिती दिली व त्यांनी कार्यकर्त्यांचा पोहोचवा टाकून वावी टोल नाक्यावरील आंदोलन स्थळी भेट दिली.
महत्वाचे ..
” श्री . वेलजाळी यांचे उपोषण चालू असताना प्रहारच्या कार्यकर्त्यांनी भेट दिली असता . त्यांच्या समोर बाजूला परत एक्सीडेंट झाला आहे . तात्काळ श्री .वेळजाळी. भाऊसाहेब लोंढे .कैलास दातीर .भाऊसाहेब सांगळे यांनी ॲम्बुलन्स मध्ये बसून त्या लोकांना बसून दिले..”
दीपक वेळजाळी यांनी सांगितले आहे की किड्या मुंग्यासारखे माणसं मरत असतील तरीही अधिकारी कुठल्या निवेदनाची उपोषणाची दखल घेत नाही म्हणून ” अधिकारी ठोकू आंदोलन” केले जाईल, जबाबदार अधिकाऱ्यांना ती कुणी असो सरकारी असो खाजगी असो त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन ठोकले जाईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास दातीर यांनी दिला.
. प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब सांगळे .जनशक्तीचे तालुकाध्यक्ष कैलास दातीर. दिव्यांग कार्याध्यक्ष दत्तात्रय बोडके, तालुका प्रमुख महिला पुष्पा भोसले महिला शहराध्यक्ष संगीता आगळे अँड कांचन भालेराव प्रभारी पांडुरंग आगळे .योगेश कहांडळ .अमर गुंजाळ. डॉ. सतीश चकोर .सतीश माळी .अशोक शेळके. सुदाम शेळके. वैभव वाघ. शिवसेना नेता प्रवीण गडाख सोमनाथ तुपेगोकुळ नरोडे. प्रकाश पांगरकर .गणेश चव्हाण. श्याम कासार .अशोक देवकर. दीपक घुमरे. जालिंदर जाधव. आदी सह परिसरातील पूर्व भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.
![](https://wegwannashik.com/wp-content/uploads/2024/07/IMG_२०२४०७१०_१३३१२६-scaled.jpg)