नाशिकः HDFC सारख्या एवढ्या मोठ्या बॅंकेनेच ग्राहकांचे पैसे money ढापले
नाशिकः HDFC सारख्या एवढ्या मोठ्या बॅंकेनेच ग्राहकांचे पैसे money ढापले

वेगवान नाशिक / साहेबराव ठाकरे
नाशिक, ता. 29 – HDFC money पैसे आपल्या खिशात असले तर पाकीट चोरी जाते, पैसे घरात असले तर दरोडा पडण्याची भीती असते, मात्र पैसे सुरक्षित राहण्यासाठी बँक सगळ्यात सुरक्षित म्हणून आपण सगळे पैसे बँकेमध्ये BANK टाकतो आणि आपल्याला वाटतं की यातून थोडे फार व्याजही मिळेल. Interest
पण बँक मधील लोक जर तुमचे लाखो रुपये ढापत असतील तर दाद कोणाकडे मागणार हाच एक खरा प्रश्न आहे. नाशिक जिल्ह्यातल्या असाच एक प्रकार उघडकीस आलेला आहे. हे पैसे नाही तर लाखो रुपयाला ग्राहक गंडला गेला आहे.
तुम्ही काबाड कष्ट करून रात्रंदिवस घाम गाळून, आपले कष्टाचे पैसे बँकेमध्ये आपण एफडी FD स्वरूपामध्ये ठेवत असतो. आपला उद्देश एवढेच असतो की या पैशाला दोन पैशाचं व्याज मिळेल आणि माझ्या कष्टाला फळ येईल, मात्र जर तुमचे एफडी चे पैसे जर बॅंकनेच ढापले तर तुम्ही काय करणार असा प्रश्न ज्यांचे पैसे गेले त्यांना पडला आहे.
त्याचं झालं असं चांदवड मधील HDFC बॅंकेमध्ये 11 लाख 5 हजाराची ठेवं रविंद्र गणपत गांगुर्डे या ठेवीदाराने ठेवली होती. मात्र बॅंक मधील कर्मचा-याने गांगुर्डे यांचा इंटनेटद्वारे खाते आयडी आणि पासवर्ड तसेच मेल स्वताच्या नावावर जनरेट करुन 11 लाख 5000 रुपयांची लुट केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
घडले कसे ते जाणून घ्या…सदर खातेधारक यांच्या खात्यावर 4 लाख 10 हजार रुपये रक्कमेचे आणि ठेवीवरील पैसे अचानक गायब झाले. तेंव्हा तारिख होती 10 सप्टेंबर 2024. तेंव्हा ही बाब गांगूर्डे यांच्या लक्षात आली. ठेवी आणि सगळे असे 11 लाख 5000 हजार रुपये गायब झाले.
सागर राजेंद्र नागरे ( हल्ली मनमाड, नांदगाव ) असे बॅंकेमधील आरोपी कर्मचा-याचे नाव आहे. मात्र हा सगळा प्रकार घडल्यानंतर बॅंक व्यवस्थापक यांच्याकडे हे प्रकरण गेले होते, मात्र त्यांनी याकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष दिले नाही. मात्र सदर पैसे ढापणारा आरोप सागर नागरे हा फरार झाल्यानंतर यावर चांदवड पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जर बॅकेचं ग्राहकांना लुटत असेल तर न्याय कोणाकडे मागायचा अस प्रश्न या निमित्ताने येतो. ही घटना चांदवड तालुक्यातील जर असली तरी महाराष्ट्रातील तुमचे कोणत्याही बॅंकेत खाते असु द्या, आपला बॅंके आयडी व पासवर्ड बॅंकेच्या लोकांना सुध्दा सांगु नका असे बोलण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
कारण जे कर्मचारी आहे तेच जर तुमचे पैेसे ढापत असतील तर तुम्ही काय करणार हा मोठा प्रश्न आहे. हा विषय चांदवडचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. कारण ही घटना चांदवड मध्ये होऊ शकते तर महाराष्ट्रातील कोठेही का घडू शकतं नाही. असे ग्राहक बोलत आहे. त्यामध्ये बॅंक पण एचडीएफसी सारखी असेल तर मग काय म्हणावे..
त्यामुळे काळजी घ्या आणि सावधं वागा…
