तुम्हाला पाहिजेत तेवढं कर्ज घ्या, व्याज भरण्याची गरज नाही Loan requirement
तुम्हाला झेपलं तेवढं कर्ज घ्या, व्याज भरण्याची गरज नाही Loan requirement

वेगवान नाशिक
नाशिक, ता. 29 सप्टेंबर 2024- Loan requirement कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा उद्योग धंदा सुरू करण्यासाठी आपल्याला पैशाची money अत्यंत गरज असते हा पैसा moneyसहज आपल्याकडे उपलब्ध होत नाही त्यामुळे आपल्याला बँकेकडून कर्ज Loan घ्यावा लागतं कर्ज Loanघेतल्यानंतर बँका त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात व्याज लावतात आणि तुम्ही एवढं व्याज Interest भरुन बेजार होतात. मात्र आम्ही तुम्हाला आज अशी माहिती सांगणार आहे की ज्या तुम्हाला फक्त कर्ज Loan घेतल्यानंतर व्याज Interest भऱण्याची गरज राहणार नाही.
तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे. तर हे शक्य आहे. मात्र तुम्हाला याची माहिती हवी.. महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आधार देण्यासाठी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाची स्थापना 1998 मध्ये करण्यात आली. हे मंडळ मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तरुणांना सक्षम करण्याच्या उद्देशाने विविध कर्ज व्याज Loan Interest परतफेड योजना राबवते.
या योजनांमध्ये तरुणांना सहभागी करून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांच्या विकासाला चालना देणे हे ध्येय आहे. यामध्ये लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे ते समजून घ्या….
लाभार्थी पात्रता:
लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा पुरुषांसाठी 50 वर्षे आणि महिलांसाठी 55 वर्षे आहे.
वार्षिक उत्पन्न निर्दिष्ट मर्यादेत आले पाहिजे (सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेल्या प्रमाणपत्राद्वारे परिभाषित केल्याप्रमाणे).
लाभार्थ्याला महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचे लाभ मिळालेले नसावेत.
अपंगत्व निकषांनुसार अर्ज करत असल्यास, अर्जाच्या वेळी अपंगत्व प्रमाणपत्र आवश्यक आहे.
एखादी व्यक्ती फक्त एकदाच या योजनेचा लाभ घेऊ शकते.
अपंगत्व श्रेणी अंतर्गत अर्ज करताना अपंगत्व प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
कर्ज व्याज परतफेड योजना:
थोडक्यात, बोर्ड बँकेकडून घेतलेल्या कर्जावरील व्याज कव्हर करते, तुमच्यासाठी कर्ज व्याजमुक्त करते. तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र बँका आणि व्यक्तींची यादी देखील येथे तपासू शकता.
यामध्ये तुम्हाला 15 लाख रुपयांपर्य़त कर्ज घेतल्यानंतर त्याचे सर्व व्याज आण्णासाहेब पाटील महामंडळ हे भरत असते. तुम्ही फक्त कर्जाचे घेतलेले हप्ते भरायचे आहे. कारण तुमच्या कर्जावरील व्याज हे एक प्रकार माफ होतं…तुम्हाला फक्त हा पैसा एक मदत म्हणूनचं मिळतो असे म्हटले तरी वावगे ठरणाऱ नाही.
