नाशिक जिल्ह्यात या मोठ्या महामार्गा वरून जाताना काळजी घ्या.नाहीतर हात पाय मोडालाचं..
नाशिक जिल्ह्यात या मोठ्या महामार्गावरून जाताना काळजी घ्या

वेगवान नाशिक / Wegwan NASHIK
नांदगाव, दिनांक 28 सप्टेंबर 2024, शनिवार (मुक्ताराम बागुल):- नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरातून जाणारा इंदौर-पुणे हम हम मार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. मनमाड शहरातील कॅम्प ते दहेगाव या भागामध्ये अक्षरशः एक ते दीड फूट खोल खड्डे पडलेले असून या खड्ड्यामुळे दररोज अपघात होत आहेत या खड्ड्यामुळे अनेकांना मोठ्या प्रमाणावर दुखापती झाल्या आहेत. तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. एवढेच नव्हे तर काहींना आपले प्राण देखील गमावे लागले आहे. त्यामुळे तुम्ही जर या रस्त्याने जाण्याचा विचार करताय तर ही बातमी तुम्हाला सावधं करणारी आहे.
महामार्गावरील येवल्याच्या पुढे टोल वसुली केली जाते. मात्र तोड कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन्ही विभागाला जागा येण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे युवक तालुकाध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे. मात्र या दोन्ही विभागाचे अधिकारी, कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत. अजून किती बळी घेतल्यावर या विभागाला जाग येईल? असा सवाल गुरुकुमार निकाळे यांनी विचारला आहे.
नांदगाव तालुक्यातील मनमाड शहर हे रेल्वेचे मोठे जंक्शन जंक्शन असून मनमाड शहरातून जाणारा इंदौर-पुणे हा महामार्ग भारत देशातील सर्वात व्यस्त महामार्ग म्हटले तरी वावगे ठरणार नाही. इंदोर, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, हिमाचल प्रदेश, यासह उत्तर भारतात जाणारा व पुणे, सोलापूर, बेंगलोर, कर्नाटक, तामिळनाडू यासह दक्षिण भारतात जाणारा एकमेव सरळ आणि जवळचा महामार्ग आहे.
मनमाड येथून मालेगाव कडे जाऊन तो मुंबई – आग्रा महामार्गाला कनेक्ट होतो. तर सोलापूर, नागपूर महामार्गाला मोठ्या प्रमाणात रहदारी आहे. या महामार्गावर असलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून अनोखे आंदोलन करण्यात आले. मनमाड शहरातून जाणारा इंदोर-पुणे हा महामार्ग सर्वात व्यस्त महामार्ग म्हणून प्रसिद्ध आहे. या महामार्गावर मनमाड शहराच्या दोन्ही भागाला जोडणारा एकमेव रेल्वे ओव्हरब्रिज आहे या ओव्हर ब्रिजवर देखील इतके खड्डे पडले आहेत की या खड्ड्यात मोटरसायकल अर्ध्याच्या वर मावते. रात्रीच्या अंधारामध्ये तर हा महामार्ग अजिबात दिसत नाही.
या महामार्गावर जर अपघात होऊन कुणाचा जीव गेला तर टोल वसूल करणाऱ्या कंपनीवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करू. तसेच लवकरात लवकर या खड्ड्यांची डागडुगी पुरी झाली नाही तर कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता तीव्र स्वरूपाचे आंदोलन खेळण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे योग तालुकाध्यक्ष गुरु कुमारनिकाळे यांनी दिला आहे.
