नाशिक मधील ‘या’ गावाला ५० लाखांचा पुरस्कार, एवढ्या पैशाच काय करणार गावं
नाशिकमधील 'या' गावाला ५० लाखाचा पुरस्कार, एवढ्या पैशाच काय करणार गावं
वेगवान नाशिक/Wegwan Nashik:-
नाशिक, ता. 28 सप्टेंबर 2024- महाराष्ट्र राज्य शासनाचा माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत नाशिक विभागात दीड हजार ते अडीच हजार लोकसंख्या असलेल्या गटातून झाडाचे नंदनवन फुलविण्यात दरी ग्रामपंचायतीला ५० लाखाचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
तालुक्यातील दरी ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा ४.० अंतर्गत गावाच्या हद्दीत ७८ हजार वृक्ष लागवड करुन नाशिकसाठी ऑक्सिजन पाॅकेट तयार केले आहे, गावात अपारंपारिक उर्जा श्रोताचा वापर करुन पिठाची गिरणी, सोलर पथदीप, पाणीपुरवठा योजनेसाठी लागणारी वीज, ग्रामपंचायत कार्यालय आदी सर्व वीज सोलरचा वापर केला आहे,
त्याच प्रमाणे गावातील पायाभूत सुविधा अंतर्गत भुमिगत गटार, रस्ते, पथदीप, आरोग्य उपकेंद्र, डिजीटल शाळा, अंगणवाडी, आदी उपक्रमात उल्लेखणीय काम केल्याने शासनाच्या या गटातील प्रथम क्रमांक पटकावला आहे.
दरी ग्रामपंचायतीने यापुर्वी राष्ट्रीय स्तरावरील पंचायत सशक्तीकरण पुरस्कार दोन वेळेस, २४ एप्रिल २०२२ पंडीत दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन मिळाला आहे.
सध्या ग्रामपंचायतीवर जगन्नाथ सोनवणे हे प्रशासक आहेत, मात्र, माजी सरपंच अलका गांगुर्डे, उपसरपंच सुनिता बेेंडकुळी, सदस्य शितल पिंगळे, अरुण दोंदे, भाऊराव आचारी, अर्जुन भोई, सारिका भोई, भारत पिंगळे, संजना ढेरिंगे, मिना आचारी यांच्या कार्यकालात उल्लेखनीय कार्य झाल्याने गावाला पुरस्कार मिळाल्याचे ग्रामपंचायत अधिकारी सचीन पवार यांनी सांगितले. पुरस्कार जाहीर होताच गावात आनंद व्यक्त करण्यात आला.