नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीच्य सचिवावर होणार कारवाई
नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीचे सचिवावर होणार कारवाई

वेगवान नासिक / Wegwan NASHIK
नांदगाव, दिनांक 27 सप्टेंबर 2024, शुक्रवार
(मुक्ताराम बागुल) :- नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अमोल खैरनार हे मनमानी व नियमाबाह्य कारभार करीत असल्याचा चौकशी अहवाल प्राप्त होतात उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांनी नांदगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळाला सचिव अमोल खैरनार यांचे विरुद्ध कायदेशीर शिस्तभंग विषयक कारवाई करण्याचे आदेश दिले असून याबाबत संपूर्ण नांदगाव तालुक्यासह नाशिक जिल्ह्यचे लक्ष लागले आहे.
नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथील शेतकरी जगन्नाथ पाटील यांनी दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांच्याकडे संपूर्ण पुराव्यानिशी तक्रार अर्ज दाखल करून नियमबाह्य व मार्केट यार्ड कमिटीच्या हितास बाधा आणणाऱ्या सचिव अमोल खैरनार यांची चौकशी होऊन त्यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबत तक्रार अर्ज दिलेला होता.
या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक यांनी चौकशी अधिकारी यांची नेमणूक करून स्वयं स्पष्ट अहवाल मागितला होता. सदर चौकशीमध्ये सचिव अमोल खैरनार पूर्णतः जोशी आढळून आल्याचा अहवाल निबंधक सहकारी संस्था नांदगाव यांनी उपजिल्हा निबंधक सहकारी संस्था नाशिक यांच्याकडे सादर केलेला होता. त्या अनुषंगाने सचिव अमोल खैरनार यांची विरुद्ध कार्यवाही करण्याचे पत्र क्रमांक 7618/2024 नुसार सभापती व संचालक मंडळांने कारवाई करावी असे आदेश देण्यात आलेले आहेत.
या दोषारोप चौकशी अंती निघालेला निष्कर्ष असा आहे की, नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्रातील तीनही यार्ड मिळून परवानगी असलेल्या 178 व्यापाऱ्यांपैकी नियमानुसार फक्त 75 व्यापारी असून उर्वरित 103 व्यापाऱ्यांची बँक ग्यारंटी दिलेली नसतानाही सचिव अमोल खैरनार यांनी त्यांना खरेदी विक्रीची परवानगी देऊन अ वर्ग खरेदी दाराचा दर्जा दिलेला आहे. तसेच नांदगाव यार्डावर 94 व्यापाऱ्यांपैकी दहा लाख रुपयांचा बोजा चढविण्यात आलेला फक्त 14 व्यापारी असून दहा लाख रुपयापेक्षा कमी पूजा असलेले 20 व्यापारी असून साठ पर्वानाधारक व्यापाऱ्यांच्या मालमत्तेवर बोजा चढविलेला नसतानाही परवाने देण्यात आलेली असल्याची चौकशीअंती समोर आलेली आहे.
तसेच संचालक मंडळाने परवानगी देण्याबाबत दिनांक 11 फेब्रुवारी 2022 रोजी जनरल मीटिंगमध्ये केलेला ठराव क्रमांक 07 नुसार परवाने प्रदान करण्यास अटी व शर्तीची पूर्तता करून दिल्यानंतर परवाने देण्यात यावे या नियमांचे पालन सचिव अमोल खैरनार यांनी केलेली नाही हे स्पष्ट झाल्याने चौकशी अंतिम यांनी नोंदविलेल्या दोषा रोपाचे निष्कर्षानुसार बाजार समितने व्यापाऱ्यांना परवाने देताना बँक गॅरंटी घेणे, इतर बाबीची पूर्तता करून घेण्याची बाजार समितीचे अधिकार व कार्यक्षेत्रात असल्याने बाजार समितीतील दोषी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग विषयक कारवाई करण्याचे अधिकार बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळाला असल्याने चौकशी अहवालातील निष्कर्षाच्या अनुषंगाने
महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास व विनियमन अधिनियम 1963 व त्याखालील नियम 1967 मधील तरतुदी तसेच बाजार समितीचे मंजूर उपविधी व सेवानिमातील तरतुदीनुसार बाजार समितीचे स्तरावरून नियमोहित कारवाई करावी तसेच व्यापारी व आडते यांना परवानगी देताना आवश्यक असलेले सर्व बाबींची पूर्तता करून घेणे बाबत तात्काळ आवश्यक ती कारवाई करावी अशी आदेश जिल्हा उपनिबंधक फय्याचं मुलांणी यांनी नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांना दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी च्या पत्रानुसार दिलेले आहेत.
तेव्हा अशा बेजबाबदार नियमबाह्य व बाजार समितीच्या हितास बाधा आणणाऱ्या सचिव अमोल खैरनार यांच्याविरुद्ध सभापती आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असून दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या मार्केटच्या सर्वसाधारण सभेमध्ये याचा खुलासा सभापती यांनी करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
