नाशिक सह या जिल्ह्यात चक्रीवादळाची स्थिती, येणा-या तासामध्ये सुरु होणार पाऊसHeavy rain update
नाशिक सह या जिल्ह्यात चक्रीकार वा-याची स्थिती, पुढील एवढे तास सावध Heavy rain update
वेगवान / धिरेंद्र कुलकर्णी
पुणे, ता.27 सप्टेंबर 2024 Heavy rain update महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना पावसानं चांगलंच झोडपून काढलेला आहे. हवामान विभागाकडून सप्टेंबरच्या अखेरीस संपूर्ण राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि पुण्याला तर रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्र म्हणजे नाशिक, जळगाव, धुळे सह इतर जिल्ह्यांमध्ये चक्रीकार वा-याची स्थिती निर्माण झाली आहे. म्हणजे एक प्रकारे हे चक्रीवादळाचाच प्रकार आहे. मात्र याचे प्रमाणात मुसळधार पाऊस पाडणार असते. Cyclone status of this wind including Nashik, watch out for the next hour
समुद्रामध्ये तयार होणारे चक्रीवादळ हे भयानक रुप धारण करत असते. मात्र हवेमद्ये चक्रीकार स्थिती निर्माण झाल्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन जोरदार पाऊस पडतं असतो. हवेची ही चक्रीय स्थिती वाढत गेली तर त्याचे रुपांत मोठ्या चक्रीवादळामध्ये होते. आणि मग तांडव सुरु होते.
पुणे आणि मुंबईला पावसाला चांगलं झोडपून काढला आहे, त्याचबरोबर हवामान विभागाचा एक ताज अपडेट प्राप्त झालेला आहे. या अपडेट मध्ये नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्र मध्ये जोरदार असा पाऊस होण्याचा अंदाज आहे. पुण्यातील काही भागांसह घाट भाग रायगड नाशिक मुंबई ठाणे पालघर नगर पूर्व विदर्भात पुढील काही तासांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबईकरांची पावसाने संपूर्ण वाट लावली तर तर, पालिका प्रशासनाचीही झोपचं उडाली आहे. रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नागरिकांना इच्छित ठिकाणी पोहोचण्यासाठी काही मिनिटांच्या ऐवजी अनेक तासांचा कालावधी लागला.
उत्तर महाराष्ट्रात हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. उत्तर बांगलादेशापासून या चक्रीय स्थितीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे नेहमी सप्टेंबर महिन्यात परतीचा वाट धरणारा पाऊस अजूनही कमी झालेला नाही.
उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर आहे. यामुळेच राज्यभरात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यांवर तयार झालेल्या वाऱ्याच्या चक्रीय स्थितीमुळे अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्प खेचले जात आहेत. यामुळेच राज्यात पाऊस कायम राहणार आहे. मात्र शनिवारपासून राज्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे.