नाशिक जिल्ह्यात कुटुंब घरात असताना वीज कोसळली

वेगवान नाशिक/मारुती जगधने
नाशिक: जिल्ह्यातील नांदगांव येथील गिरणानगर चे हनुमाननगर आज पहाटे साडेचार च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यात हनुमान नगर येथील धनाजी केदा गुंजाळ सर यांच्या घरावर या सुमारास वीस पडली.
त्यामुळे त्यांच्या घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या शिवाय सौ संगीता धनाजी गुंजाळ यांच्या पायावर घरातील जळती वायरिंग पडली.
त्यामुळे त्यांच्या पायाला इजा झाली दैव बलवत्तर म्हणून घरातील इतर कोणालाही इजा झाली नाही.
मनुष्यहानी टळली. वीज पडली तेव्हा परिसरात मोठा आवाज झाला आजूबाजूचे परिसरातील लोक जागे झाले व काय झाले हे त्यांना क्षणभर समजले नाही. शिवाय वीज पडल्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले.
गुंजाळ सर व सौ. संगिता गुंजाळ मॅडम हे घाबरून गेले होते. त्यांच्या घरातील संपूर्ण इलेक्ट्रिक वायरिंग, तसेच केबल, टि.व्ही.,फ्रिज, व इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळुन गेल्या. शिवाय पलंगावरील गादी जळाली. तर समोर राहात असलेले शेखर पाटील यांच्या घरातील राउटर,फॅन, टि.व्ही. तर संजय शेवाळे यांचा टि.व्ही. पंकज सोनवणे व गवळी यांचे फॅन व आजुबाजुला इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या बाबतची माहिती मिळताच तलाठी सिरसाठ ,गिरणानगरचे सरपंच अनिता राहुल पवार, उप सरपंच अनिल म्हसु आहेर,पोलिस पाटील बाळु पाटील,ग्रा.पं.सदस्य वैशाली राजेंद्र कुटे, सचिन आहेर, ॳॅड.उमेश सरोदे,न.पा.चे अंबादास सानप , गिरण्या नगरच्या ग्रामसेविका हिमगौरी आहेर,ग्रा.पं.कर्मचारी राजेंद्र भातकुटे यांनी धनाजी गुंजाळ याचे घराची पहाणी करण्यात आली.
वीज पडते तेव्हा सुरक्षित राहण्यासाठी खालील उपाय करावेत:
1. आश्रय घ्या: वीज पडते तेव्हा घरामध्ये किंवा सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबा. घरामध्ये खिडक्या-दारे बंद करा.
2. धातूंच्या वस्तूंपासून दूर राहा: विजेच्या तारा, पाण्याचे पाइप, धातूच्या वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर रहा, कारण वीज या माध्यमातून पसरू शकते.
3. इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करा: विजेच्या गडगडाटादरम्यान टीव्ही, संगणक, मोबाईल चार्जर इ. बंद ठेवावेत.
4. पाण्यातून किंवा पाण्याजवळ जाणे टाळा: पाण्यामध्ये उभे राहणे किंवा पाण्याजवळ असणे धोकादायक ठरू शकते.
5. झाडाखाली उभे राहू नका: झाडे वीज आकर्षित करतात, म्हणून झाडाखाली उभे राहणे टाळा.
6. वाहनामध्ये थांबा: जर तुम्ही वाहनामध्ये असाल, तर वाहनातच थांबा. धातूचे बाह्यभाग विजेपासून सुरक्षित ठेवू शकतात.
7. जमिनीवर झोपू नका: शक्यतो जमिनीला थेट स्पर्श टाळावा. वीज जमिनीवर पसरू शकते.
8. मदतीसाठी कॉल करा: काही नुकसान झाले असल्यास अथवा आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदतीसाठी कॉल करा.विजेच्या गडगडाटाच्या वेळी हे उपाय केल्याने तुमची सुरक्षितता वाढते.
