नाशिक ग्रामीणशेती

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस, घरामध्ये घुसले पाणी

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस, घरामध्ये घुसले पाणी,तर अनेक ठिकाणी पिके वादळामुळे भुईसपाट जाली आहे.


वेगवान नाशिक

नाशिक, ता. 26 सप्टेंबर 2024-  नाशिक शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला काल व सलग तीन दिवसापासून पडणा-या पावसाने अक्षरक्षा झोडपून काढले आहे. काल झालेल्या पावसामुळे अनेक घरामध्ये पाणी घुसल्याच्या घटना घडल्या आहे.  Heavy rain in Nashik district, water entered the house

 

नाशिक जिल्ह्यात सलग दोन दिवसापासून पाऊस पडत आहे. ग्रामीण भागामध्ये सोयाबीन पिक काढणीसाठी आलेले असतांना वादळी पावसाने पिके भुईसपाट केली आहे. निफाड तालुक्यात मका, सोयाबीन पिक भुईसपाट झाल्याने शेतक-यांचे मोठं नुकसान झाले आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

 

देवळाली कॅम्पसह नाशिकरोड शहर परिसरामध्ये काल रात्रीच्या सुमारास एक तास मुसळधार पाऊस पडला. यामुळे रस्त्यांवर चौकडे पाणीच पाणी झाले होते. ( अपेडट देवळाली प्रतिनिधी )

 

(मुक्ताराम बागुल यांच्याकडून वृत्त) नाशिक जिल्ह्यासाठी आज हवामान विभागाने अॅरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे आज सकाळी पासून चांदवड सह इतर ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

 

नांदगाव तालुक्यातील बोलठाण परिसरात दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी सहा वाजेपासून ते नऊ वाजेपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

 

बोलठाण परिसरात पाऊस सुरू होण्याच्या अगोदर ढगांचा गडगडात आवाज सुरू झाला. त्यामुळे बोलठाण परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. सदरचा पाऊस मध्यम स्वरूपाचा पडल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे थोड्याफार प्रमाणात का होईना नुकसान झालेले शेतकरी राजा हळहळ व्यक्त करताना दिसत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या विहिरींना व नद्या तलाव पाणी आलेले नाही त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जास्त जाणवीर असे बोलठाण परिसरातील शेतकरी, नागरिक चर्चा करत आहे.

 

(अविनाश पारखेंकडून अपडेट ) मनमाड- सुमारे अर्ध्या तासापासून शहरात चांगला पाऊस सुरू आहे. कधी मधी ढगांचा गडगडाट होत असून अजून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता दिसत आहे.खबरदारी म्हणुन शहरातील वीज पुरवठा खंडित आहे.
हा पाऊस विहीर, बोअरवेल ची पाणी पातळी वाढीसाठी उपयोगाचा असल्याचे नागरिक आपसात चर्चा करताना आढळले.

 

मालेगाव तालुक्याही पावसाने हजेरी लावली आहे. येवला तालुक्यातील अनेक घरामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे घरामध्ये पाणी घुसल्यामुळे शहरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!