अरे..देवा ! नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेती पिक भुईसपाट,आज तर भयानक इशारा
अरे..देवा ! नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेती पिक भुईसपाट
वेगवान नाशिक / अरुण थोरे
निफाड, ता. 25- परतीच्या पावसाने लावलेल्या जोरदार हजेरी ने काल दिनांक २४ सप्टेंबर रोजी निफाड तालुक्यातील शेती पिकांचे नुकसान झाले असून, पंचनामे करण्याची मागणी शेतकर्यांकडुन होत आहे.
निफाड पूर्व भागात काल संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास सुरू झालेला पाऊसाने रात्रभर चांगलाच धुमाकूळ घातला. पावसासोबत काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वारे असल्याने मका व बाजरी पीक भुईसपाट झाले.
काढणीला आलेला व काढून ठेवलेला सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने कांदा रोपांचे ही नुकसान झाले आहे.
निफाड पूर्व भागातील वेळापूर, पाचोरे, गोंदेगाव, मरळगोई ,भरवस, वाहेगाव सह रुई वाकद शिरवाडे, आधी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने त्वरित पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होताना दिसत आहे.
प्रतिक्रिया –
काल रात्री आलेल्या पावसा सोबत जोरदार वारा असल्याने मका पिक भूईसपाट झाले असुन, भाजीपाला पिकांसह सोयाबिन मकांचे मोठे नुकसान झाले असून, प्रशासनाने त्वरीत पंचनामे करावे.
गोपीनाथ नागरे- (शेतकरी)
पाचोरे बु. ता. निफाड