नाशिक शहर

अखेर त्या मंदिराच्या दानपेट्या सील, धर्मदाय आयुक्तांनी दिले आदेश

तीन दिवसांपूर्वी दानपेटीच्या पैशावरून झाले होते वाद


वेगवान नाशिक/ Wegwan Nashik                                  विशेष प्रतिनिधी,२५ सप्टेंबर.

नाशिकच्या रामकुंडासमोरील श्री कपालेश्वर महादेव मंदिर परिसरातील पाच दानपेट्यांबाबत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने, धर्मादाय आयुक्तांनी या दानपेट्यांवर सरकारी कुलूप लावण्याचा आदेश दिला आहे. हा निर्णय पुढील अंतिम आदेश होईपर्यत लागू राहील. मंदिरातील दानपेट्यांच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

श्री कपालेश्वर मंदिराच्या सभागृहात असलेली माेठी दानपेटी नियमबाह्य पद्धतीने ठेवलेली आहे. दानपेटीत टाकल्या जाणाऱ्या पैशांचा नेमका उपयोग हाेताे, किती पैसे येतात, त्याचे काेणतेही ऑडिट झालेले नसल्याचा आरोप कपालेश्वर देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता. त्यानंतर धर्मादाय आयुक्तांकडे या प्रकरणी तक्रार करण्यात आली व यानंतर धर्मादाय आयुक्त यांनी ही अनधिकृत दानपेटीच धर्मादाय आयुक्तांनी आपल्या ताब्यात घेत दानपेटीसंदर्भातील सर्व आर्थिक व्यवहारांबाबत चाैकशी करण्याची मागणी कपालेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.अक्षय कलंत्री, सचिव ॲड.प्रशांत जाधव यांनी केली होती. यावेळी विश्वस्त श्रद्धा दुसाने-कोतवाल, मंडलेश्वर काळे आदींनी केली होती.यामुळे गुरवांच्या वादात आता कपालेश्वर देवस्थान ट्रस्टीदेखील सहभागी झाले आहेत. मंदिरातील दानपेटीतील पैशांच्या मुद्द्यावरून दाेन दिवसांपूर्वी गुरव कुटुंबीयांमध्ये ऐन मंदिरात माेठा वाद निर्माण झाला हाेता. या वादाचा व्हिडिओदेखील समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने दानपेटीचा वाद चांगलाच रंगला होता.

या पार्श्वभूमीवर कपालेश्वर देवस्थान ट्रस्ट संस्थानच्या वतीने मंदिर सभागृहात दोन छाेट्या दानपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. यात जमा हाेणाऱ्या पैशांच्या माध्यमातून मंदिर परिसराचा विकास व भाविकांच्या सुविधांसाठी कामे केले जातात. यातील प्रत्येक रुपयाचा हिशेब सादर केला जातो. मात्र, दुसरीकडे मंदिरात असलेली माेठी दानपेटी गुरुव कुटुंबीयांनी अनधिकृतपणे ठेवली आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांना यातच पैसे टाकण्याचा आग्रह केला जाताे. मात्र, यात आलेला पैशांचा नेमका काय उपयाेग हाेताे, किती पैसे आतापर्यंत संकलित झालेत? याबाबत गुरवांकडून काेणतीही माहिती दिली जात नव्हती.या कारणामुळे वारंवार वाद हाेत होते. दर्शनासाठी नियमित येणाऱ्या भाविकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे या दानपेटीबाबत धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टच्या वतीने घेण्यात आला होता.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

या कपालेश्वर मंदिरात नाशिक जिल्ह्याबरोबरच देशभरातील कानाकोपऱ्यातून शिवभक्त दर्शनासाठी हजेरी लावतात. विशेष म्हणजे, रोज हजारोच्या संख्येने बाहेरच्या राज्यातील पर्यटक, भाविक कपालेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन रोख स्वरूपात दानपेटीत दान टाकत असतात. मात्र, या दानाच्या पैशातूनच दोन पुजाऱ्यांमध्ये वाद झाल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. या-ना त्या कारणावरून कपालेश्वर मंदिरातील पुजारी नेहमीच चर्चेत असतात. त्यातच आता दोन पुजाऱ्यांमधील वाद सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, एक कमी वयाचा पुजारी हा पैशांसाठी दुसऱ्या पुजाऱ्याच्या चक्क अंगावर धावून जातानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते.यामुळे या दानपेटीबाबत धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टच्या वतीने घेण्यात आला होता. अखेर या प्रकरणी पाचही दानपेटी सील करण्याचा निर्णय धर्मादाय आयुक्त यांनी दिला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!