चक्रीवादळः महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये काही तासांमध्ये पावसाचे तांडव cyclone-heavy-rains-in-these-districts-of-maharashtra
चक्रीवादळः महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचे तांडव Cyclone: Heavy rains in these districts of Maharashtra
वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव
मुंबई, ता. 25 सप्टेंबर 2024- गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईसह राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पावसाची ही स्थिती आणखी आठवडाभर कायम राहण्याची शक्यता आहे. आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे तसेच नाशिक येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. Cyclone: Heavy rains in these districts of Maharashtra
नाशिक जिल्ह्याला काल जोरदार पावसाने झोडपले आहे. काल दुपारी पासून नाशिक जिल्ह्याच्या विविध भागामध्ये ढगांचा गडगडाट आणि वीजेचा कडकडाट ऐकण्यास मिळत होता. रात्री पासून ते सकाळी पाच वाजे पर्यंत पाऊस सुरु होता.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात पाऊस पडत आहे. मंगळवारी रात्री ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर होता, बुधवारी त्याचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय, रायगड, पुणे आणि घाटांच्या डोंगराळ भागांसाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. आज मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामानाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात आणि म्यानमारच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर हवेची चक्रीय स्थिती (चक्रीवादळा सारखी ) स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन ते महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरातील या हंगामी परिस्थितीमुळे, पूर्व किनारपट्टीवर मुसळधार पावसाची अपेक्षा आहे, ज्यामुळे किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या भागात पावसाची तीव्रता वाढली आहे. पुढील चार दिवस विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात वादळी वारे आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू दरम्यान, नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. वायव्य राजस्थान आणि कच्छ भागातून सोमवारी (२३ सप्टेंबर) मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला. यंदा सलग 14 व्या वर्षी माघार उशिरा सुरू झाली. साधारणपणे, माघार 17 सप्टेंबरच्या आसपास सुरू होते, परंतु यावर्षी ती सात दिवसांनी सुरू झाली. गेल्या वर्षी, 25 सप्टेंबरला माघार सुरू झाली. या वर्षीच्या विलंबामुळे राज्यात 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत, 8 ऑक्टोबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे.
आज या ठिकाणी अतिवृष्टी होणार काही ठिकाणी जोरदार तांडव पाहण्यास मिळणार
रायगड, पुणे जिल्ह्यालांना रेड अलर्ट जारी केला आहे. या ठिकाण राहणा-या लोकांनी सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
नाशिक, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, या जिल्ह्यासाठी आॅरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अतिवृष्टी होऊन पुर येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रताील इतर जिल्ह्यांसाठी मात्र यलो अलर्ट आहे. म्हणजे पाऊस जोरदार ते मध्य स्वरुपामध्ये पडणार आहे.