चांदवड येथे या तारखेपासून सुरु होणार भुसार लिलाव
चांदवड येथे या तारखेपासून सुरु होणार भुसार लिलाव Bhusar auction will start from this date in Chandwad
वेगवान नाशिक
चांदवड कृषि उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांना भुसार माल विक्रीसाठी जवळची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, तसेच वेळ व खर्चात बचत व्हावी, याकरीता बाजार समितीचे मुख्य आवार, चांदवड येथे गुरुवार दि. 03/10/2024 रोजी सकाळी 11.00 वा. भुसार (मका, सोयाबीन, गहु, बाजरी, मुग इ.) शेतीमालाचा लिलाव शुभारंभ होणार आहे. Bhusar auction will start from this date in Chandwad
चांदवड बाजार समितीचे कार्यक्षेत्रात मका, सोयाबीन, बाजरी इ. शेतीमाल काढणीचा हंगाम सुरु झालेला असल्याने बाजार समितीचे मा.सभापती श्री.संजय जाधव यांचे अध्यक्षतेखाली भुसार शेतीमालाचे आडते / खरेदीदार व्यापारी यांची सभा घेण्यात आली. सदर सभेत मुख्य बाजार आवार, चांदवड येथे गुरुवार दि. 03/10/2024 रोजी सकाळी 11.00 वा. वाजता भुसार शेतीमाल (मका, सोयाबीन, गहु, बाजरी इ.) लिलाव सुरु करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
यावेळी भुसार शेतीमाल व्यापारी (सर्व श्री) गणेश वाघ, महेंद्र अजमेरे, संतोष जाधव, प्रसाद सोनवणे, सुनिल निकम, निलेश वाघ, प्रतिक वाघ, भुषण हेडा, रत्नादिप बच्छाव व विलास चव्हाण आदि व्यापारी उपस्थित होते. दैनंदिन भुसार शेतीमाल विक्रीची रक्कम माल विक्रीच्या दिवशीच रोख स्वरुपात अदा केली जाणार असुन सोमवार ते शनिवार दैनंदिन सकाळी 11.00 ते सांय 06.00 या दरम्यान सुरु राहणार आहेत.
तरी शेतकरी बांधवांनी आपला भुसार शेतीमाल (मका, सोयाबीन, बाजरी गहु, मुग इ.) शेतीमाल सुकवुन व प्रतवारी करुन मुख्य बाजार आवार, चांदवड येथे मोठ्या प्रमाणात विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती मा.श्री.संजय दगुजी जाधव, उपसभापती मा.डॉ.सौ वैशाली शामराव जाधव, सर्व संचालक मंडळ व सचिव श्री. गोरक्षनाथ गांगुर्डे आणि भुसार व्यापारी असोसिएशयन यांनी केले आहे.