नाशिक सह या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा, धडाम धूमचा आवाज होणार Heavy rain in Nashik
नाशिक सह या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा, धडाम धूमचा आवाज होणार Heavy rain in Nashik

वेगवान नाशिक / धिरेंद्र कुलकर्णी
नागपूर, ता. 24- Heavy rain in Nashik नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून ठीक ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडतोय मात्र काल नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाने अक्षरशः धिंगाणा घातला आहे नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागासह नाशिकच्या अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार अशी सलामी दिली. Nashik weather
हवामान विभागाने नाशिक साठी एक अपडेट जारी केलेला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार असा पाऊस पडणार असून अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागामार्फत वर्तविण्यात आलेली आहे.
ढगांचा गडगडात आणि विजेचा कडकडाट होणार आहे आणि ढग मोठ्या प्रमाणात आकाशामध्ये गरजणार आहे. काल 23 रोजी नाशिक जिल्ह्यातील मनमाड, चांदवड तालुक्याचा पूर्व भागामध्ये मुसळधार अश्या पावसाने झोडपुन काढले आहे.
कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राकडे सरकत असल्यामुळे नाशिक जिल्ह्यासाठी आज येलो अर्ट देण्यात आला असून उद्या मात्र अॅरेंज अलर्ट दिला आहे. त्याच बरोबर 25 आणि 26 या दोनही दिवस जोरदार पाऊस पडणार असून काळजी घेण्याचा आवाहन करण्यात आले आहे.
आकाशातून वीज कोसळण्याचे प्रमाणा या पावसामध्ये मोठ्या प्रणाणात असून आकाशामध्ये ढगांचा प्रचंड आवाज होणार असून वीजांचा प्रखर प्रकाश जमीनीवर पडणार असून वीज कोसळण्याचे प्रमाणाही वाढू शकते.
या पावसासोबत वा-याचे प्रमाण राहणार असून वादळी वा-यासह हा पाऊस होणार आहे.
इतर महाराष्ट्रात सुध्दा पाऊस थैमान घालणाऱ असून आम्ही तुम्हाला हवामान विभागान कोण कोणत्या जिल्ह्यांना इशारा दिला आहे ते आपण नकाशामध्ये पाहु शकतात.
महाराष्ट्रातील आज रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तसेच 25 सप्टेंबरला नाशिक अहमदनगर पालघर ठाणे ,वाशिम जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे तर पुणे आणि रायगड या जिल्ह्यांना मात्र रेड अलर्ट आहे.
उर्वरित महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली वगळता सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
24 Sep, Heavy rainfall alerts for Maharashtra during next 4,5 days by IMD.
Pl keep watch on alerts by IMD pic.twitter.com/ATAJ1RZsqk— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 24, 2024
