सरपंच, उपसरपंच होणार मालामाल, सरकारने एवढं मानधन वाढविले sarpanch-deputy-sarpanch salary
सरपंच, उपसरपंच होणार मालामाल, सरकारने एवढं मानधन वाढविले
महाराष्ट्र न्यूज / धिरेंद्र कुलकर्णी
मुंबई, ता. निवडणूक कोणतीही असू द्या पद कोणत्याही असू द्या मान असतोच, आणि दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत प्रत्येकजण मान सन्माना साठी भुकेला असतो, असाच मान गावच्या सरपंचालाही मिळतो, मात्र आता गावचा सरपंच फक्त मान सन्माना पुरता मर्यादा राहिलेला नाही तर आता गावचे सरपंच आणि उपसरपंचांचा मानधन सरकारने वाढ केलेली आहे. The sarpanch, deputy sarpanch will be rich, the government has increased the salary so much
आपल्याला प्रश्न पडला असेल की सरपंच मालमाल कसे होणार, तर सरपंच उपसरपंच हे फक्त नावासाठी येथून मागे काम करत होते. गावातील प्रतीष्टसाठी गावातील निवडणूक होत होती. आता मात्र मानतर मिळतोच आहे. मात्र वरुन पैसे पण सरकारने सुुरु केले आहे.
राज्यातील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून या पदाचे नाव ग्रामपंचायत अधिकारी करण्यास आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
ग्रामसेवक (एस-8) व ग्रामविकास अधिकारी (एस 12) ही दोन्ही पदे एकत्र करून त्यांना 25500 – 81,100 या वेतन श्रेणीतील ग्रामसेवक हे मूळ पद कायम ठेवून या पदाचे नाव ग्रामपंचायत अधिकारी असे करण्यात येईल. तसेच नव्या ग्रामपंचायत अधिकारी पदास दहा वर्षानंतरच्या सेवेचा पहिला लाभ विस्तार अधिकारी (एस 14) वीस वर्षांच्या सेवेनंतरचा दुसरा लाभ सहायक गटविकास अधिकारी ( एस 15) व तीस वर्षांनंतरच्या सेवेचा तिसरा लाभ गटविकास अधिकारी (एस 20) असा मिळेल.
राज्यातील सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार 6 हजार, 8 हजार आणि 10 हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळेल. तर उपसरपंचांना 2 हजार, 3 हजार आणि 4 हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळेल.
सध्या सरपंचांना 3 हजार, 4 हजार आणि 5 हजार रुपये इतके मानधन मिळते. तर उपसरपंचांना 1 हजार, दिड हजार आणि 2 हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळते. राज्यात 27 हजार 943 ग्रामपंचायती आहे.